निगडीत आठ दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:02+5:302021-05-04T04:18:02+5:30
मसूर : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामदक्षता कमिटी यांच्यातर्फे निगडी, ता. कऱ्हाड येथे ३ ते ...
मसूर : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामदक्षता कमिटी यांच्यातर्फे निगडी, ता. कऱ्हाड येथे ३ ते १० मेपर्यंत आठ दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.
येथील ग्रामपंचायतीत सरपंच सुप्रिया संतोष पाटील, उपसरपंच विनोद देटके, मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीसपाटील सुजाता पाटील, ग्रामसेवक आर. बी. मोमीन, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण घोलप, तसेच सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामदक्षता कमिटी सर्व सदस्य व व्यापारी उपस्थित होते. या सर्वांच्या बैठकीत जनता कर्फ्यूबाबत सर्वांच्या संमतीने ठरले आहे.
या कालावधीत काय बंद राहणार...
सर्व प्रकारचा भाजीपाला व फळे विक्री करणारी दुकाने, फिरती दुकाने, सर्व प्रकारचे किराणा माल व्यावसायिक सर्व प्रकारचे चिकन, मटण व मासे व्यावसायिक, केसकर्तनालय बंद राहणार आहेत. या कालावधीत दूध वितरण सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६.३० ते ८ पर्यंत चालू राहील व दवाखाने पूर्ण वेळ चालू राहतील.
ज्या घरात कोरोना रुग्ण आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट ट्रेस करून विलगीकरण करण्यास सांगितले आहे. तसेच सर्व सदस्यांनी त्या-त्या भागातील ऑक्सिमीटरने तपासणी करण्याचे ठरले.
तरी सर्व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन सर्वानुमते करण्यात आले.