शिरढोण ग्रामस्थांनी जगविली आठशे झाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:52+5:302021-06-27T04:24:52+5:30
सातारा : साताऱ्याच्या मातीत अनेक चळवळी रुजल्या, वाढल्या अन् फोफावल्याही. या भूमीला हिरवा शालू मिळवून देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील ...
सातारा : साताऱ्याच्या मातीत अनेक चळवळी रुजल्या, वाढल्या अन् फोफावल्याही. या भूमीला हिरवा शालू मिळवून देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथील ग्रामस्थांनी चंग बांधला आहे. गेल्यावर्षी तीन एकर जागेत ८५४ झाडे लावली होती. त्यातील आठशे झाडे जगली असून, त्यांची वाढही चांगली झाली आहे. या मोहिमेत यंदा पुन्हा एक हजार फळझाडांचे वाटप केले जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतीच्यावतीने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये गेल्यावर्षी तीन एकर क्षेत्रात ८५४ झाडे लावली होती. यामध्ये देशी आणि फळे देणाऱ्या झाडांची निवड करण्यात आली. या झाडांवर पक्षी येऊन बसतात. त्यांना खाण्याची सोय होते. त्यामुळे हरित परिसराबरोबरच निसर्ग चांगला बहरेल याचा विचार करण्यात आला आहे.
झाडे जगविण्यासाठी शेजारच्या शेतातून एक इंच पाणी घेतले होते. मात्र पुढे शेतासाठी पाणी अपुरे पडू लागले. त्यामुळे रात्रपाळीत पाणी दिले. पुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात धोम कालव्यातून ठिबक सिंचनचा वापर करून झाडे जगविण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे झाडे सरासरी तीन ते पाच फुटांपर्यंत वाडली आहेत. त्यामुळे गावाचे रुपडेच पालटले आहे.
या मोहिमेत सरपंच सुधीर पवार, सचिन घोरपडे, मिलिंद साळुंखे, गणेश घोरपडे, नारायण बोधे, मच्छिंद्र पवार, ग्रामसेवक तृप्ती जाधव, तुषार घोरपडे, सचिन जाधव परिश्रम घेत आहेत.
चौकट :
घरटी दोन झाडे
वृक्षारोपण मोहिमेत गेल्यावर्षी मिळालेल्या यशाचा विचार करू यंदा पुन्हा एक हजार फळझाडांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्यांनी जुनी झाडे जगविली असतील, त्यांना घरटी दोन झाडे देण्यात येणार आहेत.
फोटो आहे.
२६शिरढोण
कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथे गेल्यावर्षी लावलेली झाडे चांगल्याप्रकारे वाढली आहेत. ते जगविण्यासाठी परिश्रम घेतले जात आहे.