सर फाऊंडेशनतर्फे आठ कर्तृत्ववान शिक्षकांचा आज सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:47+5:302021-04-03T04:35:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरमच्यावतीने जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरमच्यावतीने जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती साताऱ्याच्या महिला समन्वयक लिना पोटे व जिल्हा समन्वयक रवींद्र जंगम, प्रदीप कुंभार यांनी दिली.
हा सोहळा शनिवारी (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. जाई तुषार वाकचौरे, राज्य कर उपायुक्त जाई वाकचौरे, धावपटू तथा तहसीलदार ललिता बाबर यांच्या हस्ते होणार आहे.
शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये लीना मारुती पोटे, दुर्गा गोरे, भारती ओंबासे, रूपाली शिंदे, ज्योती कदम, सुवर्णा साळवी, जयश्री क्षीरसागर, सुरेखा कुंभार यांची निवड झाली आहे. निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे (वाघ), राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी कौतुक केले आहे.