साताऱ्यात आठ पोलीस कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:09+5:302021-05-27T04:42:09+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच जिल्हा पोलीस दलातीलही आठ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच जिल्हा पोलीस दलातीलही आठ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व पोलीस कर्मचारी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील आहेत.
सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी दुपारी ँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकूण आठ पोलीस कर्मचारी आणि तीन होमगार्ड कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना अलंकार हॉल येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले. पहिल्या लाटेमध्ये जवळपास ६०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते, तर दुसऱ्या लाटेमध्ये ६४ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर एकाच वेळी बुधवारी आठजण बाधित आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या सर्व कर्मचा-यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये बुधवारी दुपारी पोलिसांनी ७० जणांची कोरोना चाचणी केली. यामध्ये दोनजण पॉझिटिव्ह आढळून आले. संबंधित व्यक्तींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.