पालिका रुग्णालयात आठ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:40+5:302021-03-20T04:39:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सातारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सातारा पालिकेच्या गोडोली व राजवाडा येथील रुग्णालयात गेल्या १८ दिवसांत तब्बल ८ हजार ७३२ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली असून, दररोज सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच काही खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लस मोफत असली तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र यासाठी २५० रुपये शुल्क आकारले जात आहेत.
सातारा पालिकेकडून कस्तुरबा रुग्णालय व गोडोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातील ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही रुग्णालयांत दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे नागरिकांना लस दिली जात आहे. ऑनलाइनमुळे नोंदणीत अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून रुग्णालयाकडून एक दिवस अगोदर नावनोंदणी करून नागरिकांना टोकन दिले जात आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी लसीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होत असून, लसीकरणही गतीने होत आहे. कस्तुरबा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवकांकडून लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. दि. १ मार्चपासून ८ हजार ७३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
फोटो मेल : लसीकरण
साताऱ्यातील कस्तुरबा रुग्णालयातील लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (छाया : जावेद खान)