विनयभंग, मारहाणप्रकरणी अठराजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:20+5:302021-07-20T04:26:20+5:30
सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेला अश्लील हातवारे, इशारा केल्यानंतर त्याचा जाब विचारला म्हणून तिच्या कुटुंबातील तिघांना लाकडी दांडक्याने ...
सातारा : तालुक्यातील एका गावातील महिलेला अश्लील हातवारे, इशारा केल्यानंतर त्याचा जाब विचारला म्हणून तिच्या कुटुंबातील तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अठराजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेशी पांग्या (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीने तक्रारदाराच्या पत्नीशी अश्लील हातवारे केले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता, त्यांचे वडील, मुलगा यास चार ते पाच अनोळखींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर मंग्या, मंग्याची पत्नी, विजय चव्हाण, राजू चव्हाण, विजय चव्हाण याची पत्नी आणि राजू चव्हाण याची पत्नी (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) व इतर दोन अनोखळी स्त्रिया व नऊ पुरुष असा अठराजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक पाटोळे करत आहेत.