खराडेत सरपंचपदी सुनीता कदम यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:41+5:302021-02-26T04:53:41+5:30
खराडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर लढविण्यात आली होती. त्यानुसारच सरपंचपदी सुनीता कदम व उपसरपंचपदी विक्रम गुरव यांना ...
खराडे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर लढविण्यात आली होती. त्यानुसारच सरपंचपदी सुनीता कदम व उपसरपंचपदी विक्रम गुरव यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निखिल खांडेकर यांनी काम पाहिले. निवडीप्रसंगी सरपंच पदाच्या सुनीता जाधव यांना सदस्या सविता संदीप जाधव यांनी व उपसरपंच विक्रम गुरव यांना सदस्य मोहन श्रीरंग बर्गे यांनी सुचक म्हणून सह्या केल्या, तर सदस्या वैशाली उमाजी मदने यांनी पाठिंबा दिला. याप्रकारे निवडणूक बिनविरोध पार पडली.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
फोटो : २५केआरडी०५
कॅप्शन : खराडे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता कदम व उपसरपंच विक्रम गुरव यांचा भैरवनाथ पॅनेलच्यावतीने सत्कार करण्यात आला.