महाबळेश्वरमधील 'हत्तीचा माथा'चे दर्शन थांबले
By admin | Published: May 13, 2014 11:14 AM2014-05-13T11:14:15+5:302014-05-13T13:46:12+5:30
महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असलेल्या केट्स पॉईंटच्या बाजूला असलेला 'निडल होल' येथून हत्तीचा माथा परिसरात असलेल्या आग्या मोहळामुळे दोन दिवसांपासून वनविभागाने हा पॉईंट बंद केला आहे.
महाबळेश्वर : येथील प्रसिद्ध असलेल्या केट्स पॉईंटच्या बाजूला असलेला 'निडल होल' येथून हत्तीचा माथा पाहण्यासाठी पर्यटक येतात. परंतु, या परिसरात असलेल्या आग्या मोहळामुळे दोन दिवसांपासून वनविभागाने हा पॉईंट बंद केला आहे.
केट्स पॉईंटच्या बाजूला काही अंतरावर निडल होल हा पॉईंट आहे. हा पॉईंट येथून हत्तीचा माथा दिसतो. त्याचठिकाणी मोठा कडा आहे. व कड्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आग्या मोहळ आहेत. या ठिकाणच्या मोहळावरील माशा उठल्यानंतर पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते अन् त्यांची पळापळ होते. यामुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे वनविभागने हा पॉईंट बंद केला आहे.
या ठिकाणच्या माशांचा कोणाला उपद्रव शक्यतो होत नाही. त्या पर्यटकांभोवती फिरत असताना पर्यटक घाबरुन हातातील रुमालाने त्यांना मारतात. अशावेळी हल्ला होत असावा, असा समजून माशाही हल्ला करतात. याचप्रकारच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने ही पावले उचलली. (प्रतिनिधी)