बिदालमध्ये बैलांनी मारले अठरा फुटांवरील तोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:03 PM2018-08-16T23:03:59+5:302018-08-16T23:04:04+5:30
दहिवडी : माण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती नागपंचमीदिवशी पार पडल्या. शर्यतीचे हे ३७ वे वर्ष असून, यामध्ये अठरा फुटांवरील तोरण बैलांनी मारले.
यास्पर्धेत ५६ बैल सहभागी केले होते. पहिले तोरण १३ फुटांवर चढवले. त्यामध्ये प्रत्येक बैलांना तीन फेरे दिले. पहिल्या फैरीत ५६ बैलांपैकी २५ बैल दुसऱ्या फेरीत तोरण शिवून दाखल झाले. त्यानंतर दुसरे तोरण १५ फुटांवर चढविण्यात आले. यामध्ये २५ पैकी ४ बैलांनी तोरण मारले. इतर २१ बैल दुसºया तोरणामधून बाद झाले. त्यानंतर शेवटचे तोरण तब्बल १८ फुटांवर बांधण्यात आले.
यासाठी साहेबराव काशिनाथ बोराटे यांची दोन बैले, वसंत परशुराम जगदाळे व बाबूराव विठोबा पिसाळ यांचा प्रत्येकी १ बैल यांच्यात रंगली; मात्र या चारही बैलांना १८ फुटी तोरण न लागल्याने पहिले १५ हजार रुपयांचे बक्षीस या चार बैल मालकांना विभागून दिले.
दुसºया क्रमांकाचे १३ फूट तोरण शिवलेल्या २१ बैल मालकांना रुपये १० हजारांचे विभागून देण्यात आले. तृतीय बक्षीस राखून ठेवण्यात आले. उत्कृष्ट बैल म्हणून शिवाजी नथुराम जगदाळे, अनिल महाडिक, निनाम पाडळी. शिवाजी भगवान जाधव, बिदाल यांच्या बैलाची निवड करण्यात आली. यंदा प्रथमच अरुण जगदाळे, नाना चिरमे यांच्या गायीनेही सहभाग घेतला. पंधरा फूट तोरणातून बाद झालेल्या शिवाजी नथुराम जगदाळे यांच्या बैलाने अंतिम फेरीतील कोणत्याही बैलाने न मारलेले १८ फुटी तोरण मारून आलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली.
आमदार जयकुमार गोरे, निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, सुरेखा पखाले, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, प्रवीण इंगवले, उपविभागीय आधिकारी लक्ष्मण बोराटे, बापूराव दडस, आयकर आयुक्त तुषार जाधव, डॉ. सत्यजित जगदाळे, धनंजय जगदाळे, गोरखनाथ बोराटे, हणमंत जगदाळे उपस्थित होते.
धनंजय जगदाळे, किशोर इंगवले, सुरेश जगदाळे, हणमंत जगदाळे, तानाजी मगर, हणमंत जगदाळे, शिवाजी जगदाळे, ताराचंद जगदाळे, प्रताप भोसले, निवृत्ती जगदाळे, आबा पाटील, सतीश जगदाळे, सुरेश जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, सोना चांदीवाले, अप्पा देशमुख, चंद्रकांत ढोक, बापूराव जगदाळे, मधुकर मदने, नंदकुमार पिसाळ, अजित बोराटे यांनी समालोचन व नियोजन केले.
वॉटर कप स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
यावेळी वॉटर कप स्पर्धेत तालुक्याला पाणीदार करण्यासाठी योगदान देणाºया तालुका समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार राज्यामध्ये यश मिळविलेले टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, भाटकी, वाघमोडेवाडी या गावांतील ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.