आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:24+5:302021-02-20T05:50:24+5:30
खंडाळा : ‘आरक्षण आमच्या हक्काचं, आम्ही ते मिळवणारच’ असा इशारा देत मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर ...
खंडाळा : ‘आरक्षण आमच्या हक्काचं, आम्ही ते मिळवणारच’ असा इशारा देत मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवावी व इतर मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयासमोर खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपोषणस्थळी शाळकरी मुलींचे शिवगान घेण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू केलेल्या या उपोषणाला दिवसभरात अनेकांनी भेट दिली. या साखळी उपोषणात संतोष देशमुख, जितेंद्र गाढवे, तानाजी गाढवे, गणेश गाढवे, सौरभ गाढवे, शिरीष गाढवे, संदीप ननावरे, मयूर शिर्के, प्रशांत जंगम, सुरज साळुंखे, निखिल खंडागळे यांनी सहभाग घेतला. शिवसंस्कार ग्रुप, पारगाव यांनी पोवाडा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. या साखळी उपोषणाचे गाववार नियोजन केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तालुक्यातील सर्व गावागावांमध्ये फिरुन जनजागृती करण्यात येत आहे.
१९खंडाळा
खंडाळा येथे साखळी उपोषणावेळी तहसीलदार कचेरीसमोर शाळकरी मुलींनी शिवगान सादर केले.