डोंगरावरच्या रानभाज्यांची मुंबईकरांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:00 PM2018-06-24T23:00:15+5:302018-06-24T23:00:27+5:30

Embark on the hills of the mountains to the Mumbaikars | डोंगरावरच्या रानभाज्यांची मुंबईकरांना भुरळ

डोंगरावरच्या रानभाज्यांची मुंबईकरांना भुरळ

Next

लक्ष्मण गोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणोली : बामणोली व तापोळ्याच्या डोंगररांगांमध्ये उगवलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्या ग्रामस्थांना खुणावू लागल्या आहेत. औषधी अन् दुर्मीळ असलेल्या या रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून देवाण-घेवाण सुरू झाली असून, या भाज्यांचे महत्त्व जाणणारे मुंबई येथील रहिवाशांकडून या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे.
कास, बामणोली, तापोळा हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. घनदाट जंगलांची व्यापलेल्या येथील डोंगररांगांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती आजही आढळून येतात. या वनस्पतींबरोबरच केवळ पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्याही अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. या भाज्या दुर्मीळ, औषधी अन् पौष्टिक असल्याने पावसाळ्यात या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केला जातो. पावसाळा नुकतान सुरू झाला असून, विविध प्रकारच्या रानभाज्या डोंगरांगांमध्ये उगवू लागल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शेंडवल, वाघचौडा, सक्रोबा (भारंगी) रानअळू, फरसुंगी, काटवेल, टाकळा, मासाळ या रानभाज्या डोंगरात उगवल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा आहारात समावेश करू लागले आहेत. या भाज्यांचे महत्त्व जाणणारे ग्रामस्थ एकमेकांना व नातेवाइकांना या भाज्यांची देवाणघेवाण करू लागले आहे. एवढेच नव्हे तर मुंबई व सातारा येथे राहणाºया नागरिकांकडूनही या भाज्या खाण्यासाठी मागविल्या जात आहेत. स्थानिक शेतकºयांकडून या भाज्यांची बाजारपेठत विक्री केली जात आहे. भाज्यांबरोबर रान अळंबी व भोपीडही उगवू लागली आहे. रान अळंबीची भाजी तसेच आमटीही केली जाते.
आरोग्याला लाभदायक...
या रानभाज्यांपैकी अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यापैकी सक्रोबा भारंगी ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी आहे.
रान अळू ही रक्तवाढीसाठी तसेच कुरडू ही भाजी मूळव्याधीवर बहुगुणी मानली जाते. या भाज्या म्हणजे आजीबाईचा बटवा समजल्या जातात.
रानभाज्या आरोग्याला लाभदायक असल्याने घरातील वयस्कर मंडळी तरुण पिढीला या भाज्या खाण्यासाठी आग्रह करत असतात.

Web Title: Embark on the hills of the mountains to the Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.