शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:26 AM2020-02-16T01:26:39+5:302020-02-16T01:27:46+5:30

वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग

 Emphasis on disciplined, safe transportation | शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

शिस्तबद्ध, सुरक्षित वाहतुकीवर राहणार भर

Next
ठळक मुद्दे ‘ब्लॅक स्पॉट’वर उपाययोजना आवश्यक

संजय पाटील।

क-हाड : दंडात्मक कारवाई हा वाहतुकीला शिस्त लावण्याचा एक भाग असला तरी फक्त कारवाई करून संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येतील. शिस्तबद्ध, अपघातविरहित आणि सुरक्षित वाहतुकीवर आमचा भर राहील, असे मत महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : अपघाती क्षेत्र किती? त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?
उत्तर : शेंद्रे ते पेठनाक्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग तसेच कºहाड-सांगली, कºहाड-विटा, कºहाड-कोयनानगर, कºहाड-कोकरूड, कºहाड-तासगाव हे मार्ग आमच्या अखत्यारीत येतात. या हद्दीत २६ ठिकाणे अपघाती आहेत. त्या-त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाला सुचविल्या आहेत.

प्रश्न : जोडरस्ते सुरक्षित आहेत का?
उत्तर : उपमार्ग ज्याठिकाणी महामार्गाला जोडले जातात त्याठिकाणी महामार्गावर रम्बलर तसेच उपमार्गावर गतिरोधक उभारण्याची सूचना केली आहे. या उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. त्याचबरोबर उपमार्गावरील अडथळे हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वसूचना देणारे फलक, ब्लिंकर्स बसविण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

प्रश्न : सुरक्षित वाहतुकीसाठी कशावर भर राहील?
उत्तर : लेनकटिंग, वेगमर्यादा ओलांडणे, विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, सिटबेल्ट नसणे, धोकादायक माल वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी असते. त्यामुळे अशा चालकांवर कटाक्षाने कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना समजही दिली जात आहे.


महामार्गावर वाहने अडवत नाहीच!
महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे कारवाईसाठी कोणतेही वाहन थांबविण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत नाही. अप्पर पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सुरक्षित ठिकाणी कारवाई केली जाते. ई-चलन पद्धतीने दंड आकारणी केली जात असल्याने वाहने अडविण्याचा प्रश्नच नाही.

कोल्हापूर नाका धोकादायक!
कोल्हापूर नाक्यावरील वाढते अपघात पाहता याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. सातारा-कोल्हापूर लेनवरील एक लेन कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या वाहनांसाठी वापरात यावी, अशी आमची सूचना आहे. त्याचबरोबर याठिकाणी उड्डाण पूल झाल्यास अपघात टळतील. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. याबाबत संबंधित विभागाशी आम्ही पत्रव्यवहारही केला आहे.

 

Web Title:  Emphasis on disciplined, safe transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.