जिल्ह्यात लसीकरणावर भर द्या : संजोग कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:57+5:302021-08-22T04:41:57+5:30
जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...
जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. ज्ञानेश्वर हिरास, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण व कार्यालयीन अधिकारीवर्ग उपस्थित होता. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गेले अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून प्रश्नाबाबत टोलवाटोलवी केली जात असल्याचे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले आहेत, तर काही प्रश्नांत काही त्रुटी असल्याने त्याला विलंब होत असल्याचे सांगितले.
यावर डॉ. संजोग कदम म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खोल्यात निवृत्त झालेले, बदली झालेले कर्मचारी अद्यापही राहत आहेत त्या लवकरात लवकर खोल्या रिकाम्या झाल्या पाहिजेत.
अनुकंपा भरती प्रश्न मार्गी लावा, पुण्याच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत आहेत. टेस्टिंग पण जास्त आहे. जिल्हयातील लसीकरण कसे जास्त होईल यावर भर द्या, लसीचा साठा जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले, तर नुसत्या माना डुलवू नका, कागदपत्रे हलवा अशा सूचना देत पुढील १५ दिवसांनंतर अचानक पुणे उपसंचालक कार्यालयाची टीम भेट देऊन किती कामे मार्गी लागली याची पाहणी करणार आहे. त्यावेळी कोणाच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.