करंजे येथील ओढ्यात घाणीचे साम्राज्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:03+5:302021-04-03T04:35:03+5:30
करंजे : करंजे येथील अनेक ओढ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. करंजे येथे बरेच ओढे आहेत. शासनाने या ओढ्यांकडे दुर्लक्ष ...
करंजे : करंजे येथील अनेक ओढ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. करंजे येथे बरेच ओढे आहेत. शासनाने या ओढ्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
करंजे येथील सुभाषचंद्र बोस चौक, पैंजण टाईल्स, महानुभाव मठ येथील ओढ्यांमध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तसेच ओढ्यातील पाणी दूषित झाले आहे. या ओढ्यात प्लास्टिक कचरा पडलेला पाहायला मिळत आहे. या ओढ्यामध्ये घरगुती कचरा, दुकानातील कचरा तसेच बेकरीमधील खाण्याचे पदार्थ टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा येथे वावर दिसून येत आहे.
कधी-कधी दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन एकीकडे स्वच्छता अभियान राबविताना दिसत असले तरी या ओढ्यांकडे शासनाचे लक्ष नाही. थोड्याच दिवसांत पावसाळा सुरू होईल व कचऱ्यामुळे ओढे तुंबले जातील. दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत येईल. यामुळे लोकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच प्रशासनाने लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
०२करंजे ओढा