धोम उजव्या कालव्यात कचऱ्याचे साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:16+5:302021-04-18T04:38:16+5:30

वाई : यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत भद्रेश्वर पूल परिसर तसेच हद्दीतून जाणाऱ्या कालवा सेवारस्त्यावर स्वयंघोषित कचरा डेपो झाल्यामुळे परिसरातील ...

Empire of garbage in Dhom right canal! | धोम उजव्या कालव्यात कचऱ्याचे साम्राज्य!

धोम उजव्या कालव्यात कचऱ्याचे साम्राज्य!

Next

वाई : यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत भद्रेश्वर पूल परिसर तसेच हद्दीतून जाणाऱ्या कालवा सेवारस्त्यावर स्वयंघोषित कचरा डेपो झाल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाई शहरामधून कृष्णामाई वाहते. तर शहराच्या दोन्ही बाजूने धोम धरणाचे डावा व उजवा कालवे वाहतात. नागरी वस्तीमधून जाणाऱ्या कालव्यामध्ये सुशिक्षित नागरिकही कालवा म्हणजे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण असल्याप्रमाणे कचरा टाकत असतात.

वाई शहरातील दत्तनगर ते सह्याद्रीनगर या भागात यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये तसेच कालव्याच्या शेजारून जाणाऱ्या सेवारस्त्यावर परिसरातील नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये भरून कचरा, प्लास्टिक, घरात छोटे-कार्यक्रम झाल्यास पत्रावळ्या नियमित येणाऱ्या घंटा गाडीत न टाकता कालवा परिसरात टाकतात. यामुळे परिसराला बकाल स्वरूप येऊन दुर्गंधी पसरते. प्लास्टिक खाल्ल्याने पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाला असून, काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस मद्यपी बसत असल्यामुळे नागरिकांना त्रास होऊन परिसरात काचा व प्लास्टिकचे साम्राज्य होत असते. सकाळी, संध्याकाळी या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात, त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी ग्रामपंचायतीने कचरा उचलावा व अशाप्रकारे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी आचारसंहिता दिली आहे.

ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी. जेणेकरून कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण बंद होऊन आरोग्यास धोका पोहोचू नये. यासाठी ठरावीक वेळेत ग्रामपंचायतीकडून कचरा गाड्या फिरत असून, त्यामध्येच नागरिकांनी कचरा टाकावा. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे. याचा नागरिकांना सोयीस्कररित्या विसर पडताना दिसत आहे. तरी अशा बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कोट...

दत्तनगर ते सह्याद्रीनगर या परिसरातून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणणारे लोकही सर्रास कचरा टाकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मद्यपींचा उपद्रवही वाढला आहे. नागरिकांनी घंटागाडीमध्ये कचरा टाकावा. यशवंतनगर ग्रामपंचायतीने डोळेझाक न करता संबंधित नागरिकांवर कडक कारवाई करावी.

- विकास सावंत, नागरिक, यशवंतनगर

१७वाई

Web Title: Empire of garbage in Dhom right canal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.