स्मशानातल्या स्वच्छतेने कर्मचाऱ्यांची पहाट, कऱ्हाड स्वच्छता मोहीम : तीन ट्रॉली कचरा केला गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:41 PM2018-05-07T23:41:23+5:302018-05-07T23:41:23+5:30
संतोष गुरव ।
कऱ्हाड : दररोजची पहाट ही प्रत्येकाला सुंदर दृश्याने सुरू व्हावी, अशी वाटत असते. ती जर स्मशानातील दृश्याने झाली तर अशीच कºहाड पालिकेच्या कर्मचाºयांची पहाट सोमवारी येथील पालिकेच्या स्मशानभूमी परिसरातील स्वच्छतेने झाली. त्यांनी चार तासांत स्मशानभूमी परिसरासह नदीकाठचीही स्वच्छता केली.
कधी कृष्णानदी काठची स्वच्छता तर कधी मनात आलं तर मैलोनमैल जाऊन रायगडाची स्वच्छता. हे करू जाणं फक्त कºहाडकरांनीच. त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात. मग आपण कोणत्या ठिकाणी स्वच्छता करतोय, याच भानही त्यांना राहत नाही. रायगडावर स्वच्छता मोहीम फत्ते पाडल्यानंतर स्वगृही परतलेल्या कºहाड पालिकेच्या मुख्याधिकाºयांसह वीस कर्मचाºयांनी सोमवारी येथील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आणि चार तासांच्या या स्वच्छतेतून तब्बल तीन ट्रॉली भरेल इतका कचरा गोळा केला.
ज्या ठिकाणी दिवसा येण्यास प्रत्येकाची पावलं धजावत असतात. भीती वाटत असते, अशा ठिकाणी स्मशानभूमी परिसरात पहाटे स्वच्छता करणे कोणाला आवडेल? असा प्रश्न कोणाला विचारल्यास उत्तर मिळेल नाही; पण हे कºहाड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाºयांनी करून दाखवले. कर्मचाºयांनी येथील स्मशानभूमी परिसरात सोमवारी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्याबरोबर नगरसेवक प्रीतम यादव व पालिकेच्या कर्मचाºयांनी जी स्वच्छता केली. त्यानंतर हा भयावह दिसणारा परिसर सुंदर व स्वच्छ दिसू लागला आहे.
कुठे अर्धवट जळालेले बांबू
तर कुठे फुटलेली मडकी
स्मशानभूमी परिसरात सोमवारी कर्मचारी
स्वच्छतेसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी
कुठे अर्धवट जळालेले बांबू तर कुठे फुटलेली
मडकी आढळून आली. तसेच प्लास्टिक
पिशव्या, सुकलेला पालापोचाळा, हार-तुरे,
अगरबत्ती, काळेकुट्ट पडेलेले दगड दिसले. तेही कर्मचाºयांनी उचलून ट्रॉलीत टाकून बारा डबरी परिसरात नेले.
कुणाच्या हातात फावडे तर कुणाच्या पोते
कºहाड पालिकेच्या कर्मचाºयांनी स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेत टिकाव, खोरे, फावडे तसेच पोते आदी साहित्यांसह तीन ट्रॉली असा लवाजमा सोबत घेतला. स्मशानभूमी परिसरात सकाळी ठीक सात वाजता पोहोचल्यानंतर कुणी हातात फावडे घेतले तर कुणी पोते घेतले. तसेच कचरा गोळा केला.
उपक्रमांची यशस्वी अंमलबाजवणी
कºहाड पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी शहरात विविध उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. स्वच्छ वॉर्ड स्पर्धा, शौचालयावर डिजिटल यंत्रांद्वारे तक्रारीची दखल, उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापन स्पर्धा, सोळा हजार बकेटचे वाटप, प्लास्टिक पिशव्या वापराबाबत कारवाई मोहीम असे विविध उपक्रम राबविले. सध्या त्यांच्याकडून नदीकाठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.