ग्रंथालय अनुदानाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:21 PM2019-03-01T12:21:20+5:302019-03-01T12:24:06+5:30
ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी, या मागणीसाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात राज्य संघटनेच्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Next
ठळक मुद्देग्रंथालय अनुदानाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे जलसमाधी आंदोलन कर्मचारी आक्रमक : पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल
कऱ्हाड : ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी, या मागणीसाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात राज्य संघटनेच्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रवींद्र कामत म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन शिक्षणमंत्र्यांच्या सचिवांसह बैठक घेऊ तसेच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र दोन वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केलेल्या नाहीत. आमचे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने सुरू आहे.