रोजगारनिर्मितीला चालना द्यावी : विक्रमसिंह पाटणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:42 AM2021-09-26T04:42:12+5:302021-09-26T04:42:12+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात उद्योजकांनी नवनवीन उद्योग, व्यवसायासाठी प्रयत्नशील राहून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी. आपल्या तालुक्यातील, परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा ...
रामापूर : पाटण तालुक्यात उद्योजकांनी नवनवीन उद्योग, व्यवसायासाठी प्रयत्नशील राहून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी. आपल्या तालुक्यातील, परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नवनवीन उत्पादने उत्पादित करून आपल्या उद्योगात यशस्वी भरारी घेण्याचे आवाहन माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले
म्हावशी, पाटण येथे नवीन उद्योजक तरुणांच्या करिता उद्योजकता व विक्री कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट प्राधिकृत प्रशिक्षक काशिनाथ कप्ते, कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, उद्योजक राजकुमार चव्हाण, कल्पेश गंभिरे, दिनकरराव घाडगे, विलासराव शिरसागर , हिंदुराव सुतार, दीपक पाटणकर, राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काशीनाथ कप्ते म्हणाले, ‘उद्योजकतेची सुरुवात ही गरजेपासून होते पर्यटकांची गरज, समाजाची गरज शोधून आपल्या स्वतःमधील कल्पनाशक्तीला वाव द्या त्यानंतर केलेला कोणताही व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकात एक तरी गुण असतो, तो शोधा आणि कामाला लागा आलेल्या परिस्थितीप्रमाणे स्वतः बदल घडवावे.’
राजकुमार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास माधव कपिलेश्वर, लहू माने, कृष्णा शिंदे यांच्यासह तालुक्यातील नवीन उद्योजक तरुण युवक कार्यक्रमास उपस्थित होते.