रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक कामांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:12 PM2018-12-03T20:12:10+5:302018-12-03T20:20:05+5:30
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे
सातारा : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे. तब्बल ५ हजार लोकांना या निमित्ताने रोजगार मिळाला आहे.
रोजगार हमी योजनेद्वारे गतवर्षी ३५ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. सार्वजनिक कामांची मागणीच नसल्याने या कामांवर एकही मजूर सेवेसाठी नाही. मात्र, व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी मजुरी दिली जाते. सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, रेशीम उद्योग, तुती लागवड, कुक्कुटपालन शेड, फळबाग लागवड, राहती घरे, शेततळी उभारणी अशी जी व्यक्तिगत कामे आहेत, या कामावर काम करणाऱ्या २०१ रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाते. जिल्'ातील ५ हजार मजुरांना प्रतिदिन २०१ रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येते.
संबंधित मजुरांनी यासाठी ७ ते ८ तास काम करणे आवश्यक आहे. एखाद्या कामाला जेवढे मनुष्यबळ देण्यात आले आहे, त्यांनी ७ ते ८ तास प्रतिदिन काम केल्यानंतर किती दिवसांत हे काम पूर्ण होईल, याचा अंदाज बांधून रोजगार हमी योजनेतून पैसे दिले जातात.
जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २००८-०९ पासून सुरू झाली असून, आजअखेर या योजनेंतर्गत ३७ हजार ७३९ कामे पूर्ण झाली आहे. १० हजार १५७ कामे सुरू आहेत. या कामांमध्ये ३,९६२ विहिरी, ६३५ फळबाग लागवड, ४,७९८ घरकुले, शौचालये, २२८८ जनावरांचे गोठे, ४६२ पाणंद रस्ते, ४,२९९ शोषखड्डे, २,९३० गांडूळ नाडेफ खत युनिट आदी कामे करण्यात आली आहेत.
इतर कामांमध्ये रोपवाटिका, सीसीटी, तलावातील गाळ काढणे, वृक्षलागवड आदी कामे आहेत. एप्रिल २०१८ पासून सातारा जिल्'ात १९ हजार ९३२ जॉब कार्डधारक कुटुंंबातील ३३ हजार ३१ मजुरांनी काम केले आहे. चालू आर्थिक वर्षात १ हजार २८८ कामे पूर्ण असून, ३ हजार ३११ कामे प्रगतिपथावर आहेत.
८ हजार नवीन कामे
जिल्'तील तब्बल ८ हजार नवीन कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी) संजय पाटील यांनी दिली.
कामासाठी स्थानिक गावातील मजूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मजुरांचे स्थलांतर झालेले नाही. अकुशल कामासाठी निधी उपलब्ध आहे. रस्त्यांची, ग्रामपंचायत भवन, शाळेची मैदाने आदी कामे या मजुरांकडून केली गेली आहेत.
- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो)