कृष्णा कारखाना खासगीकरणापासून वाचविण्यासाठी संस्थापक पॅनलला सत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:55+5:302021-06-09T04:48:55+5:30
नेर्ले : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था सध्याच्या अध्यक्षांनी खासगी केल्या असून, साखर कारखाना खासगी होऊ न देण्यासाठी संस्थापक ...
नेर्ले : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था सध्याच्या अध्यक्षांनी खासगी केल्या असून, साखर कारखाना खासगी होऊ न देण्यासाठी संस्थापक पॅनलला विजयी करा, असे आवाहन संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात संस्थापक पॅनलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, संस्थापक पॅनल व रयत पॅनलच्या आघाडीबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. हा निर्णय न झाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कृष्णा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी संस्थापक पॅनलला संधी द्या.
पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासराव पाटील यांनी स्वागत केले. तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले. या वेळी किसन पाटील, संचालक सुभाष पाटील, वसंतराव पाटील, जयेश मोहिते, बाबासाहेब पाटील, जालिंदर पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, मोहन पाटील उपस्थित होते.
०७०६२०२१-आयएसएलएम-नेर्ले प्रचार न्यूज :
नेर्ले (ता. वाळवा) येथे संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी भाषण केले. या वेळी विलासराव पाटील, सतीश पाटील, किसन पाटील, जयेश मोहिते आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्था सध्याच्या अध्यक्षांनी खासगी केल्या असून, साखर कारखाना खासगी होऊ न देण्यासाठी संस्थापक पॅनलला विजयी करा, असे आवाहन संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात संस्थापक पॅनलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, संस्थापक पॅनल व रयत पॅनलच्या आघाडीबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होईल. हा निर्णय न झाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कृष्णा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी संस्थापक पॅनलला संधी द्या.