अभियंता अन् तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By admin | Published: February 7, 2017 11:02 PM2017-02-07T23:02:00+5:302017-02-07T23:02:00+5:30

खंडाळा, फलटण येथे वेगवेगळी कारवाई; ना हरकत दाखला, सातबारा उताऱ्यासाठी लाचेची मागणी

Engineer and Talathi 'Lakhalchat' in the net | अभियंता अन् तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

अभियंता अन् तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Next



शिरवळ/ फलटण : खंडाळा येथील बांधकाम शाखा अभियंता संजय अमृत सोनावणे याला सात हजारांची तर पिंपरद, ता. फलटण येथील तलाठी दीपक शिवाजी नलगे याला दीड हजाराची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
घाटदरे, ता. खंडाळा येथील एका व्यक्तीला औद्योगिक कारणासाठी बिनशेती परवानगीसाठी लागणारा ना हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी संबंधित व्यक्ती खंडाळा येथील बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता संजय सोनावणे (वय ४८, सध्या रा. साईनगरी अपार्टमेंट, शाहूनगर, गोडोली, सातारा मूळ रा. जवकडे शिम, ता. एरंडोल जि. जळगाव) याच्याकडे गेली. त्यावेळी सोनावणे याने त्यांच्याकडे आठ हजारांची मागणी केली. तडजोडीनंतर सात हजार रुपये देण्याचे ठरले. संबंधित तक्रारदाराने मंगळवारी लाचलुचपतच्या कार्यालयात जाऊन रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचून सोनावणेला सात हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, दुसरी कारवाई फलटण येथे करण्यात आली. विहिरीची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे पिंपरदचे तलाठी दीपक शिवाजी नलगे (वय ४७, रा. कोळकी, ता. फलटण) याने दोन हजार रुपयांची लाच मागितली. अखेर दीड हजारावर तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत कार्यालयात येऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवारी दुपारी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. फलटण येथील राजाळे मंडलाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर दीपक नलगे याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे, पोलिस हवालदार आनंदराव सपकाळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Engineer and Talathi 'Lakhalchat' in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.