इंग्रजी माध्यमांच्या शाळांना यंदा फी वाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:27+5:302021-04-13T04:37:27+5:30
सातारा : कोरोना काळातील शैक्षणिक फी बाबत इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०२०-२०२१ या वर्षात ...
सातारा : कोरोना काळातील शैक्षणिक फी बाबत इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०२०-२०२१ या वर्षात कोणत्याही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी फी वाढ करायची नाही व वाढ केली असल्यास ती बाघारी घ्यायचा निर्णय घेतला असल्याची माहिती इंडिपेंडंट इं.ग्लश स्कूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
साताऱ्यातील प्रमुख इंग्रजी माध्यम शाळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक फी बाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पालकांना सहकार्य करण्याचे अवाहन केले होते. त्यानुसार या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्या पालकांची कोरोना काळात परिस्थिती अडचणीची असेल त्यांना सर्व शाळा सहकार्य करणार आहेत. मात्र, जे पालक फी भरू शकतात त्यांनी मात्र फी भरलीच पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही मुलाचा शिक्षणापासून वंचित ठेवायचे नाही, जे पालक लॉकडाऊन काळात खरोखरच अडचणीत आलेत त्यांना यूपर्वी प्रत्येक शाळेने आपापल्या परीने सहकार्य केले आहे. मात्र अजूनही कोणी खऱ्या आर्थिक अडचणीत आलेत त्यांना यापूर्वी प्रत्येक शाळेने सहकार्य केले आहे. याबाबत शाळा प्रशासनाकडे पालकांनी अर्ज करावा. सरसकट सर्व विद्यार्थी यांच्या पालकांच्या फी मध्ये १० टक्के सूट द्यायची, ज्या पालकांनी आधीच संपूर्ण फी भरली असेल आणि त्यांनी कसलीच सूट घेतली नसेल ती १० टक्के फी पुढच्या वर्षीच्या फीमध्ये जमा केली जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना काळात सर्व बाजूने शाळांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचा पूर्ण पगार देणेसुध्दा मुश्कील झाले आहे. तरी पण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या भविष्याचा विचार आसि सध्या लॉकडाऊन काळातील अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून फी संदर्भात निर्णय घेण्याचे ईसाने एकमताने ठरविले असल्याचेही चोरगे यांनी सांगितले.
…………………..