जादुई नगरीचा अलोट आनंद

By admin | Published: September 3, 2016 12:28 AM2016-09-03T00:28:27+5:302016-09-03T01:04:02+5:30

‘लोकमत बाल विकास मंच’चे आयोजन : जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या कार्यक्रमाला गर्दी

Enjoy the magic city! | जादुई नगरीचा अलोट आनंद

जादुई नगरीचा अलोट आनंद

Next


सातारा : जादुई दुनियेचे विलक्षण आकर्षण असलेल्या बच्चे कंपनीने रविवारी साताऱ्याच्या शाहू कला मंदिरमध्ये ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद देत सुंदर सफरीचा आनंद लुटला. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या एकापेक्षा एक प्रयोगांनी थक्क होत बालमंच सदस्यांनी अक्षरश: जल्लोष केला.
छोट्या दोस्तांनी रविवारची सुटी द्विगुणित करण्याची संधी ‘लोकमत’ बालविकास मंचने मुलांना दिली. जादूगार रघुवीर यांच्या ‘मॅजिक शो’ने लहान मुलांसह पालकांनाही काहीकाळ तणावाचे क्षण विसरायला लावले. एकसे बढकर एक जादूच्या विलक्षण प्रयोगांमुळे आणि त्यातील हकल्या-फुलक्या विनोदांच्या पेरणीमुळे हा कार्यक्रम बालमनांवर मोहिनी टाकून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी सक्सेस अ‍ॅबॅकसचे संचालक किरण पाटील, देसाई मॅडम, अनंत ट्रेडिंग कंपनीचे प्रभा भोसले, जनार्दन भोसले, माउली सोफाजच्या अमर अग्रवाल, फायरफॉक्स बाईक स्टेशनच्या आशिष जेजुरीकर, टॉयलॅण्ड टॉय शॉपीचे गोपाळ मिनियार, हिरामोती किडस वेअरचे विजयेंद्र राठी, चकोर बेकरीचे सिद्धार्थ गुजर, एडिसन क्लबचे अनुपमा दीक्षित, दिनेश दीक्षित, सेंट पॉल्स स्कूलचे प्राचार्य धनराज पिल्लई, सूरज पवार, हिंदवी पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कुलकर्णी मॅडम, लायन्स नॅब हॉस्पिटलच्या डॉ. दाभाडे, रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजर नीलेश बळी, सोनी कस्टम्स अँड वॉचेसचे रियाझ शेख, जादूगार जितेंद्र रघुवीर, आनंद कृषी पर्यटनचे आनंद शिंदे आदींची उपस्थिती होती. जादूगार रघुवीर यांनी रविवारी वेगवेगळ्या प्रयोगांनी छोट्या दोस्तांना अक्षरश: खिळवून ठेवले. यामध्ये झेंग-झॅगबॉय, भूतनी बॉक्स, डबर एक्स्चेंज मिस्ट्री, मिस्ट्रियस सिलिंडर फ्रॉम सिंगापूर, रुबिक्स, क्यूब गेम शो, मास्टर आॅफ पेडिशन, मागाल तो पदार्थ खायला मिळणार, मानेतून तलवार आरपार, हवेत उडणाऱ्या बॉक्समधून माणसाची निर्मिती, प्रेक्षकातील मुलगी संपूर्ण अधांतरी, जाड पत्र्यामधून माणूस आरपार असे जादूचे नानाविध प्रयोग सादर केले. (प्रतिनिधी)


सक्सेस अ‍ॅबॅकसचे टेक्निक थक्क करण्यासारखे
बालविकास मंचच्या ओळखपत्राचे प्रायोजकत्व स्वीकारलेले सक्सेस अ‍ॅबॅकसचे संचालक किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अ‍ॅबॅकसविषयी माहिती दिली. हे टेक्निक आत्मसात केल्यानंतर विद्यार्थी सर्व गणिती प्रक्रिया अत्यंत कमी वेळात व कुशलतेने सोडवतात. तसेच कोणत्याही २ अंकी संख्येचा पाढा वेगाने म्हणून दाखवितात. याचे प्रात्यक्षिकही सक्सेस अ‍ॅबॅकसच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सक्सेस अ‍ॅबॅकसच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या गणिती पाढ्यांच्या आकलनामुळे उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता.

Web Title: Enjoy the magic city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.