शिक्षकांचा ऑनलाईन मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:48+5:302021-04-30T04:48:48+5:30
राज्य सरचिटणीस अनिल पलांडे, प्रसिद्धी प्रमुख संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या ...
राज्य सरचिटणीस अनिल पलांडे, प्रसिद्धी प्रमुख संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अनिल पलांडे यांनी शासकीय पातळीवर असणारे विविध प्रश्न मांडले. शंभर टक्के पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच बक्षी समिती अहवाल खंड दोन शासनाने मंजूर केल्यानंतर वेतनातील त्रुटी दूर होणार आहेत. विविध प्रश्नांसाठी संघटना प्रभावीपणे काम करीतअसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
माधवी चव्हाण, सोमेश्वर काटू, बाळासाहेब पाटील, रमेश देसाई आदींनी विविध प्रश्न मांडले. उमेश गोदे व अनिल पलांडे यांनी विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व संघटना वाढीसाठी सविसतर मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब पाटील यांनी सूचना मांडली. माधवी चव्हाण यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते पदवीधर शिक्षक सुनील सखाराम जाधव यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी स्थापन करून कामकाज प्रभावी करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.
शिक्षक व केंद्रप्रमुखांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा पूर्ण संघटित व्हावा. तसेच सर्व तालुक्यातील कार्यकारिणीने प्रभावी काम करावे. आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजेत. यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी दिली. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.