पिंपळबनात साजरा होतोय पर्यावरण मास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:35+5:302021-06-10T04:26:35+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथे गेल्या चार वर्षांपासून पिंपळबन विकसित होत आहे. पिंपळबन समिती, ग्रामपंचायत कुडाळ, ग्रामस्थ यांच्या ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथे गेल्या चार वर्षांपासून पिंपळबन विकसित होत आहे. पिंपळबन समिती, ग्रामपंचायत कुडाळ, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गावामध्ये या पर्यावरणपूरक उद्यानाची निर्मिती होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने याठिकाणी पर्यावरण मास साजरा होत असून, १ जुलैपर्यंत १००१ वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक वृक्ष लागवडीमुळे या परिसराचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. सलग चौथ्यावर्षी पिंपळबन समितीच्यावतीने कुडाळ गावात वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याचा शुभारंभ कुडाळ ग्रामपंचायतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाने करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिंपळबन या उपक्रमाला सहकार्य मिळत आहे. पर्यावरण जागृती आणि संवर्धनाची ही भूमिका कायम ठेवून पिंपळबन लवकर पूर्णत्वाला येईल. कुडाळ येथे तालुक्यातील हा पर्यावरणपूरक उपक्रम निश्चितच सर्वांसाठी आदर्शवत ठरेल. या समितीच्या माध्यमातून १ जून ते १ जुलै या कालावधीत १००१ वृक्षांची लागवड करून पर्यावरण मास साजरा होत आहे.
यावेळी पंचायत समिती उपसभापती सौरभ शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, माजी सरपंच विरेंद्र शिंदे, धनंजय शिंदे, राहुल ननावरे, महेश पवार, सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ०९ कुडाळ
कुडाळ येथे साकारण्यात आलेल्या पिंपळबनात मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण मासनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. (छाया : विशाल जमदाडे)
===Photopath===
090621\polish_20210609_073126997.jpg
===Caption===
पर्यावरण मास उपक्रम साजरा