जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे फिरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 11:28 PM2017-08-07T23:28:05+5:302017-08-07T23:28:10+5:30

Equalization of the politics of the district spill! | जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे फिरली!

जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे फिरली!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच फिरल्याचे आता स्पष्टपणे पुढे आले आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी-भाजप आघाडीसमोर आता सातारा विकास आघाडी, काँगे्रस आणि शिवसेना यांचे आव्हान पाहायला मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात मोठा पक्ष असणाºया राष्ट्रवादी काँगे्रसची खेळी न भूतो अशी खेळी करून राज्यात व केंद्रात सत्तेवर असणाºया भारतीय जनता पक्षाशी आघाडी केली. कºहाडात बैठक घेऊन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायतींमधील सदस्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वबळावर चार जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. याआधीच एक जागा भाजपला बिनविरोध मिळाली. उर्वरित तीन जागेसाठी भाजपची राष्ट्रवादीसोबत बोलणी यशस्वी झाली. सोमवारी मतदान सुरू असतानाच भाजप व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींची विश्रामगृहावर बैठक पार पडली. यानंतर मतदारांना दोन्ही पक्षांनी निरोप पाठवून निर्णयाबाबत सांगण्यात आले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटासोबत भाजप जाणार नाही, हे सोमवारी स्पष्ट झाले. भाजपने स्वतंत्रपणे येऊन मतदान केले. तर काँगे्रस, सातारा विकास आघाडी व शिवसेनेच्या मतदारांनी एकत्रित येऊन मतदान केले. सातारा विकास आघाडी, काँगे्रस व शिवसेनेची मंडळी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत चर्चा करूनच जिल्हाधिकारी कार्यालयात आले. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्व नेतेमंडळींनी मतदारांना सूचना केल्या.
शिवसेनेचे आ. शंभूराजे देसाई यांनी जलमंदिरवर जाऊन खा. उदयनराजे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. त्यांच्या वाहनातून आलेल्या महिला सदस्यांनी मतदान केले. या महिला मतदारांना सोडून उदयनराजेंच्या वाहनांचा ताफा तिथून निघून गेला. त्यानंतर वाईचे आमदार मकरंद पाटील हे कार्यकर्त्यांसोबत दाखल झाले. मतदान संपेपर्यंत आमदार पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते. यानंतर साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आले. त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत चर्चा करीत थांबलेल्या भाजपच्या अनिल देसाई, संदीप शिंदे, मनोज घोरपडे, पालिकेचे गटनेते धनंजय जांभळे यांच्याशी चर्चा केली.
पोलिसांचा पहारा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी कडा पहारा ठेवला होता. प्रवेशद्वाराच्या आत ५0 फुटावर बॅरिगेटस लावण्यात आले होते. फक्त मतदारांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. कार्यकर्त्यांना पोलिस बाहेर पिटाळत होते. मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Equalization of the politics of the district spill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.