सुपनेत तीस बेडचा विलगीकरण कक्ष सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:05+5:302021-06-10T04:26:05+5:30
तांबवे : कोरोनो रुग्णांसाठी कऱ्हाड तालुक्यातील सुपने ग्रामपंचायतीच्या वतीने तीस बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रांताधिकारी उत्तम ...
तांबवे : कोरोनो रुग्णांसाठी कऱ्हाड तालुक्यातील सुपने ग्रामपंचायतीच्या वतीने तीस बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच अशोक झिंब्रे, ग्रामविकास अधिकारी धाबुगडे, गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे, डॉ. शंतनु सावंत, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, डॉ. रमेश पाटील, हिंदू एकताचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश माळी, प्रकाश पाटील, माजी सरपंच पै. सतीश पानुगडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, निवास पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सुपने विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गत महिन्यात गावामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला होता. त्यातच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या संपर्कामुळे संसर्ग अधिकच वाढत असल्याने संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय प्रशासनाने निवडला. गावोगावी संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची सूचना देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर सुपने येथील केदार हायस्कूलमध्येही तीस बेडचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे गावातील कोरोनोचा संसर्ग थांबेल, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असे मत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी यावेळी व्यक्त केले.
फोटो : ०९केआरडी०३
कॅप्शन : सुपने, ता. कऱ्हाड येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी कक्षातील सोयीसुविधांची पाहणी केली.