अर्र... हजारांचा टीव्ही तीस रुपयांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:52+5:302021-04-30T04:49:52+5:30

प्रत्येक वस्तूला ज्या त्या वेळेला किंमत असते. तिचं काम संपलं की, तिची किंमतही कवडीमोल होते. साताऱ्यातील एका कुटुंबाने एकेकाळी ...

Err ... thousands of TVs for thirty rupees! | अर्र... हजारांचा टीव्ही तीस रुपयांना!

अर्र... हजारांचा टीव्ही तीस रुपयांना!

Next

प्रत्येक वस्तूला ज्या त्या वेळेला किंमत असते. तिचं काम संपलं की, तिची किंमतही कवडीमोल होते. साताऱ्यातील एका कुटुंबाने एकेकाळी थोडी- थोडी बचत करून हजारो रुपयांना घेतलेला टीव्ही बंद पडला अन् आता ठेवायला जागा नाही म्हणून तो भंगारात घातला. तेव्हा त्याची किंमत अवघी तीस रुपये आली. (छाया : जगदीश कोष्टी)

फोटो

सातारा ‘लोकमत’ला सेंड केला आहे...

०००००००००००

खरबुजाला मागणी

सातारा : उन्हाळा हंगाम मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खरबुजांची आवक सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या लॉकडाऊन लागलेला असल्याने सर्वच माणसे घरात आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी खाण्यासाठी खरबुजांना मागणी वाढत आहे. आवकही वाढली असल्याने दहा ते वीस रुपयांना एक याप्रमाणे विक्री सुरू आहे.

-------------

कठडे दुरुस्तीची मागणी

सातारा : सातारा- कास मार्गावरील यवतेश्वर घाटात दरवर्षी सातत्याने दुर्घटना घडत असतात. सुसाट वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने गाड्या कठडे तोडून दरीत पडत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी कठड्यांची दुरवस्था झाली. कास, बामणोली या भागात अनेक गावे असून, तेथील नागरिक दररोज साताऱ्याला ये- जा करत असतात. त्यामुळे आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या मार्गावरील कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.

००००००००००००

घंटागाडी अवेळी

सातारा : सातारा नगरपालिकेची त्यांच्या हद्दीत दररोज सकाळी ६ वाजेपासून १० वाजेपर्यंत कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी येत असते. मात्र, आता हद्दीवाढीत समावेश झालेल्या गावांमध्ये अजूनही घंटागाडी वेळीअवेळी येत आहे. त्यामुळे तेथील रहिवासी कामाला गेले असल्यास कचरा टाकता येत नाही.

०००००००००

उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

सातारा : उन्हाळ्याचे चटके चांगलेच जाणवत आहेत. अजून मे महिना शिल्लक आहे. अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी खालावलेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट आहे. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये नळाला तोट्या नसल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात असते. पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी होत आहे.

०००००००००

वानरसेनेचा त्रास

सातारा : सातारा शहरालगत अजिंक्यतारा, यवतेश्वर या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर विविध प्राणी आहेत. मात्र, उन्हाळ्यामुळे डोंगरात जनावरांना खाण्यासाठी फळे, पाने मिळत नाहीत. त्यामुळे वानरसेना जंगलालगतच्या घरात जाऊन त्रास देत आहे. खाण्यासाठी काही मिळते का, याच्या शोधात ती असते.

---------

नियमांचे उल्लंघन

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडू नका, असे सांगितले जाते. जिल्हाबंदी लागू केली आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही पुण्यासह इतर जिल्ह्यांतून दुचाकीवरून तरुण येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनीच, असे कोणी बाहेरजिल्ह्यातून आलेले असूनही फिरताना आढळल्यास संबंधित विभागाला माहिती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

--------

दवाखान्यांमध्ये रांगा

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल घडत आहे. सकाळी सर्वसाधारण वातावरण असते. दुपारनंतर कडक ऊन पडलेले असते. त्यातच पाऊस झाला, तर गारवा निर्माण होता. वातावरणातील बदलामुळे डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी या व्याधी नागरिकांना जडत आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली असलेल्या दवाखान्यांंमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.

०००००

वेगळा आडवा फोटो

लॉकडाऊनमुळे कुत्र्यांचीही उपासमार!

शहरातील हॉटेल, खाऊच्या गाड्यांवर शिल्लक राहिलेले टाकत असल्याने त्यावर अनेक जनावरांचे पोट भरत असते; पण लॉकडाऊन झाल्याने हॉटेल बंद आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे कुत्र्यांचे टोळके गावातून फिरताना दिसत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही कुत्रे रस्त्यावर दिसत असायचे. (छाया : जावेद खान)

Web Title: Err ... thousands of TVs for thirty rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.