पळून गेलेले रुग्ण पुन्हा आयसोलेशन सेंटरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:35+5:302021-06-02T04:29:35+5:30

मायणी : येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार केलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री कोरोनाबाधित नऊ रुग्ण पळून गेले होते. ...

Escaped patients back to the isolation center | पळून गेलेले रुग्ण पुन्हा आयसोलेशन सेंटरमध्ये

पळून गेलेले रुग्ण पुन्हा आयसोलेशन सेंटरमध्ये

Next

मायणी : येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार केलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरमधून शुक्रवारी मध्यरात्री कोरोनाबाधित नऊ रुग्ण पळून गेले होते. पळून गेलेल्या सर्व रुग्णांना मंगळवारी दुपारी पोलीस, महसूल, आरोग्य व स्थानिक कोरोना कमिटी यांच्या संयुक्त पथकाने पुन्हा येथील कोरोना आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल केले.

याबाबत माहिती अशी की, येथील ग्रामपंचायत व कोरोना कमिटी यांच्यामार्फत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले होते. या सेंटरमध्ये गुरुवारी गृहविलगीकरण (होम आयसोलेशन) असलेले रुग्ण दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी सोयीसुविधा नसल्याचे कारण पुढे करून हे सर्व कोरोनाबाधित रुग्ण शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपापल्या घरी पळून गेल्याचे उघड झाले. आयसोलेशन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याची बातमी ‘लोकमत’ने सोमवार, दि. ३१ रोजी प्रसिद्ध केली. या बातमीनंतर प्रशासन हादरले. पळून गेलेल्या रुग्णांना परत आणण्याबाबत शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. रुग्ण पुन्हा आयसोलेशन सेंटरमध्ये किंवा पडळ, मायणी कोरोना केअर सेंटरमध्ये सोयीनुसार दाखल करण्याबाबत चर्चा झाली.

मंगळवारी वडूजचे पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख, मायणी पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, तलाठी शंकर चाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील तुरुकमाने, ग्रामसेवक समीर गाढवे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, उपसरपंच आनंदा शेवाळे, आरोग्यसेविका शबाना तांबोळी, पोलीस कर्मचारी योगेश सूर्यवंशी, प्रवीण सानप, संदीप शेंडगे, दर्याबा नरळे, अण्णाराव मारेकर, संभाजी खाडे, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुगदरे यांच्यासह आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत व स्थानिक कोरोना कमिटीतील सदस्य यांचे संयुक्त पथक तयार केले.

या पथकाने मंगळवारी दुपारी येथील बसस्थानक परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर व कचरेवाडी येथील रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा उपचारासाठी आयसोलेशन

सेंटरमध्ये किंवा पडळ व मायणी कोरोना केअर सेंटरमध्ये सोयीनुसार दाखल होण्याबाबत सांगितले. रुग्ण पुन्हा आम्ही जिल्हा परिषद शाळेतील सेंटरमध्ये दाखल होतो असे म्हटल्यावर या सर्व रुग्णांना रुग्णवाहिकेतून पोलीस बंदोबस्तात जिल्हा परिषद शाळेतील कोरोना आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल केले.

०१मायणी-कोरोना

मायणी येथील कोरोना आयसोलेशन सेंटरमधून निघून गेलेल्या रुग्णांना मंगळवारी पोलीस बंदोबस्तात पुन्हा आणण्यात आले. (छाया : संदीप कुंभार)

Web Title: Escaped patients back to the isolation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.