रायरेश्वर गडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:53+5:302021-07-08T04:25:53+5:30
वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले पवित्र ठिकाण रायरेश्वर येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मंदिराच्या प्रांगणात स्थापन ...
वाई : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले पवित्र ठिकाण रायरेश्वर येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मंदिराच्या प्रांगणात स्थापन केलेल्या पुतळ्याला तडे गेले होते. याची माहिती मावळा प्रतिष्ठानला मिळाल्यानंतर त्यांनी नवीन पुतळा बसाविण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी रविवारी रायरेश्वर येथे पुतळ्याची स्थापना करून परिसरात दीडशे रोपांचे वृक्षारोपण केले.
मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव यांनी मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी समवेत रायरेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत स्थापना केली. त्यासोबत परिसरात स्वच्छता करत वृक्षारोपण केले. यासोबत ग्रामस्थांना आणि येणाऱ्या पर्यटकांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी उद्योजक आणि समाजसेवक ज्ञानदेवशेठ सणस, बाबूशेठ चौधरी, दोस्ती ग्रुपचे दीपक पार्टे, पंकज वाडकर उपस्थित होते. या वेळी मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, अध्यक्ष सचिन जाधव, सरचिटणीस रमाकांत बने, खजिनदार महेंद्र जाधव, पुणे जिल्हाप्रमुख आनंद जोदकर, नारायण घाडगे, मयूर जाधव, बबन ननावरे, मयुरेश शिंदे, शिरीष संकपाळ, गणेश वाडकर, सागर जाधव, तानाजी मोलने, स्वप्नील घोडके आणि सदस्य यांची उपस्थिती होती.