प्रयत्न करूनही तिजोरी फुटलीच नाही... लोधवडेत धाडसी प्रयत्न : दमलेले दरोडेखोर पतसंस्थेत साहित्य टाकून पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:08 AM2018-01-16T00:08:06+5:302018-01-16T00:08:13+5:30

दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला.

  Even after trying, the safe has not broken ... Lodhwade's brave attempt: Duga | प्रयत्न करूनही तिजोरी फुटलीच नाही... लोधवडेत धाडसी प्रयत्न : दमलेले दरोडेखोर पतसंस्थेत साहित्य टाकून पसार

प्रयत्न करूनही तिजोरी फुटलीच नाही... लोधवडेत धाडसी प्रयत्न : दमलेले दरोडेखोर पतसंस्थेत साहित्य टाकून पसार

googlenewsNext

दहिवडी : माण तालुक्यातील लोधवडे येथे रविवारी मध्यरात्री अज्ञातांनी सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न करूनही तिजोरी न फुटल्याने दमलेल्या दरोडेखोरांनी आणलेले साहित्य तिथेच टाकून पळ काढला. दरम्यान, या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, पतसंस्थेच्या मागील बाजूने श्वान फिरून जागेवरच घुटमळले.

लोधवडे येथे सरस्वती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था गावाच्या मध्यभागी असून, शेजारी सोसायटीचे कार्यालय आणि प्राथमिक मराठी शाळाही आहे. मुख्य रस्त्याकडे तोंड करून पतसंस्था कार्यालय आहे. तर याच इमारतीत पाठीमागे पतसंस्थेच्या दक्षिण बाजूला रेशनिंग दुकान आहे. रविवारी नेहमीप्रमाणे कामकाज संपल्यावर कर्मचाºयांनी सायंकाळी संस्था बंद केली.

सोमवारी सकाळी पाहिले असता रेशनिंग दुकानाचे दार उघडे असल्याचे काहीजणांना दिसले. त्यानंतर संस्थेच्या कर्मचाºयांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाहिले असता संस्थेत चोरीचा प्रयत्न करण्याची घटना उघडकीस आली.
चोरट्यांनी मध्यरात्री बारा वाजण्याच्यानंतर रेशनिंग दुकानाच्या बाजूने कटावणीने दार उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर रेशनिंग दुकानाचे दार लावून घेतले.

आतल्या दाराने पतसंस्थेत प्रवेश केला व संस्थेची तिजोरी फोडण्यासाठी त्यांनी लहान आणि एक मोठा असे दोन सिलिंडर आणले होते. त्यासाठी लागणारे सगळे साहित्य अतिशय गोपनीयरीत्या आत नेले. तिजोरी ठेवलेल्या ठिकाणी जात गॅस कटरच्या साह्याने तिजोरीवर काही ठिकाणी छेद घेण्यात आले. मात्र खूप प्रयत्न करूनसुद्धा तिजोरी फुटली नाही. अखेर दमलेल्या चोरट्यांनी बरोबर आणलेले साहित्य जागीच ठेवून पलायन केले. या घटनेची फिर्याद संस्थेचे व्यवस्थापक दाजीराम जगताप यांनी दिली आहे. याघटनेचा हवालदार तुपे हे तपास करीत आहेत .

दरोड्यासाठीचे साहित्य दुचाकीवरून
या घटनेची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी म्हसवड आणि दहिवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पोलिस उपअधीक्षक चोपडे, पोलिस अधिकारी प्रकाश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने काय मार्ग सापडतोय का पाहिले. श्वानाला घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंचा वास दिला. त्याद्वारे श्वान बाहेर येऊन काही ठिकाणी फिरले व जागेवरच घुटमळले. दरम्यान, चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी लागणारे साहित्य दुचाकीवरून आणलेले असावे, अशी चर्चा घटनास्थळी होती.

Web Title:   Even after trying, the safe has not broken ... Lodhwade's brave attempt: Duga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.