‘पुरणाचे मांडे’ आजही वारकऱ्यांना आवडे अनोखं ‘फूड मॅनेजमेंट’; लोणंदमध्ये वारकऱ्यांकडून परंपरेचे जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:15 PM2018-07-13T23:15:44+5:302018-07-13T23:18:55+5:30

संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुुक्तार्इंनी मांडे भाजले होते, असे सांगितली जाते. सुमारे सहाशे वर्षांनंतरही वारकऱ्यांकडून या परंपरेचं जतन केलं जात आहे.

 Even today, 'Old Manne' is a unique 'food management' to the Warakaris; Save the tradition from Warkaris in Lonand | ‘पुरणाचे मांडे’ आजही वारकऱ्यांना आवडे अनोखं ‘फूड मॅनेजमेंट’; लोणंदमध्ये वारकऱ्यांकडून परंपरेचे जतन

‘पुरणाचे मांडे’ आजही वारकऱ्यांना आवडे अनोखं ‘फूड मॅनेजमेंट’; लोणंदमध्ये वारकऱ्यांकडून परंपरेचे जतन

Next

सातारा : संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुुक्तार्इंनी मांडे भाजले होते, असे सांगितली जाते. सुमारे सहाशे वर्षांनंतरही वारकऱ्यांकडून या परंपरेचं जतन केलं जात आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी आजही परंपरेनुसार मांडे बनवितात अन् मोठ्या आवडीने त्याचे सेवन करतात. वारकºयांचं हे अनोखं ‘फूड मॅनेजमेंट’ केवळ लोणंदमध्येच पाहावयास मिळतं.

माउलींचा पालखी सोहळा शुक्रवारी लोणंदमध्ये विसावला. या सोहळ्यात राज्यभरातील दिंड्या व वारकरी सहभागी झाले आहेत. मालेगाव येथील दिंडीलाही पाच दशकांची परंपरा लाभली आहे. पालखी लोणंद मुक्कामी आल्यानंतर या दिंडीतील महिलांकडून मांडे बनविले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून या दिंडीकडून ही परंपरा सुरू आहे. मांडे हा पुरण पोळीसारखाच गोड पदार्थ आहे.मालेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या या दिंडीत पन्नास महिलांसह एकूण दीडशे वारकरी सहभागी झाले आहेत. यापैकी दहा महिला गेल्या २५ वर्षांपासून मांडे बनविण्याचे काम करीत आहेत. ही कला पाहण्यासाठी वारकºयांनी गर्दी केली होती.

असे तयार केले जाते मांडे
हरभऱ्याची डाळ, गव्हाचे पीठ, साखर अन् पाणी योग्य प्रमाणात घेतले जाते. या सर्वांचे मिश्रण केले जाते. यानंतर तयार झालेले पीठ हातावर घडले जाते. एक मोठी कडई चुलीवर उलटी ठेवून त्या कडईवर मांडले भाजले जाते. याचा आकार सुमारे दोन ते अडीच फूट इतका असतो. दूध, खिर व भाजी बरोबर हे मांडे खाल्ले जाते.


माउलींच्या पालखी सोहळ्यात पंढरपूर येथील एक दिंडी सहभागी झाली आहे. सोहळा लोणंदमध्ये आल्यानंतर या दिंडीतील महिलांकडून मांडे बनविले जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

Web Title:  Even today, 'Old Manne' is a unique 'food management' to the Warakaris; Save the tradition from Warkaris in Lonand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.