अखेर गोपूज-पुसेसावळी खड्डे भरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:48+5:302021-09-27T04:42:48+5:30

औंध : प्रमुख रहदारीचा असणाऱ्या गोपूज-वडूज राज्यमार्गावर असणाऱ्या फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे ...

Eventually the Gopuj-Pusesavali pits began to fill up | अखेर गोपूज-पुसेसावळी खड्डे भरण्यास सुरुवात

अखेर गोपूज-पुसेसावळी खड्डे भरण्यास सुरुवात

Next

औंध : प्रमुख रहदारीचा असणाऱ्या गोपूज-वडूज राज्यमार्गावर असणाऱ्या फरशी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार प्रसिद्ध केल्याने संबंधित विभागाने खड्डे भरण्याच्या कामासह पुलाचे मोठ्या खड्ड्यात डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

गोपूज-पुसेसावळी रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. गोपूज व पळशीच्या फरशी पुलात तर मोठमोठे खड्डे पडल्याने किरकोळ पावसातदेखील त्यास डबक्याचे स्वरूप येत होते. अनेकवेळा पावसाने फरशी पूल जलमय झाला होता. त्यामुळे ये-जा-करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. तात्पुरते खड्डे भरून काही महिने निघतील. मात्र, सध्या महाराष्ट्रात सगळीकडे रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची कामे, रुंदीकरण यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु हा रस्ता एका बाजूला कऱ्हाड कोल्हापूरला जोडत आहे तर दुसरीकडे पंढरपूर, सोलापूर, नातेपुते इकडे जात आहे. मात्र, प्रचंड वाहतूक व रहदारी असणाऱ्या या रस्त्याचे काम कधी होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

खटाव तालुक्यातील ऊस येथील तीन कारखान्यांसह इतर तालुक्यातील कारखान्यांना पुरवठा याच मार्गावरून केला जात आहे. या रस्त्यावरून अनेक अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे प्रत्येकवेळी नुसते खड्डे भरून मलमपट्टी करून चालणार नाही, कारण रोज धावणारी वाहनसंख्या लक्षात घेता रस्त्याचे दर्जेदार काम होणे आवश्यक आहे.

२६औंध

फोटो : गोपूज-पुसेसावळी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. (छाया : रशिद शेख)

Web Title: Eventually the Gopuj-Pusesavali pits began to fill up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.