अखेर पावसाची जिल्हाभरात हजेरी..
By admin | Published: June 16, 2017 11:33 PM2017-06-16T23:33:15+5:302017-06-16T23:33:15+5:30
अखेर पावसाची जिल्हाभरात हजेरी..
दरवर्षी सात जूनला येणारा मान्सून यंदा तब्बल नऊ दिवस उशिरा सातारा जिल्ह्यात थडकला. शुक्रवारी या मान्सूनने संपूर्ण जिल्हाभरात हजेरी लावली. दिवसभर कडक उन असल्यामुळे रेनकोट किंवा छत्री न घेताच बाहेर पडलेले सातारकर सायंकाळच्या अकस्मात कोसळलेल्या पावसात चिंब भिजून गेले. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस पाऊस आल्याने विद्यार्थ्यांची तसेच नोकरदारांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणीही साठले.
औंध परिसरात पाऊस
औंध व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सलग तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पाणीच झाले. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
शुक्रवारी सकाळपासून औंध आणि परिसरात प्रचंड उकाडा व उष्णता वाढली होती. सायंकाळी साडे चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरूवात झाली. नांदोशी, खबालवाडी, त्रिमली,वडी, जायगाव, चौकीचा आंबा या भागास पावसाने झोडपून काढले. पावसाने चाकरमानी, शालेय विद्यार्थी, शेतकरी यांची धांदल उडाली.

फलटण तालुक्यात वरुणराजाचे वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असून शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
शुकवारी सकाळी फलटण येथे १९ मिलीमीटर, आसू २२, बरड ०२, तरडगाव ४२, गिरवी २०, तर वाठार निंबाळकर येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी चांगल्या व मध्यम स्वरूपात पाऊस पडला असून अजून एक ते दोन वेळा पाऊस झाल्यास शेतीच्या कामाला वेग येईल. धरण क्षेत्रात अजुनही समाधानकारक पाऊस झाला आहे.