दररोज अनेक गरजूंच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:39 AM2021-07-28T04:39:51+5:302021-07-28T04:39:51+5:30
सातारा : राज्य शासनाने गरीब, गरजूंसाठी शिवभोजन थाळी आणली असली तरी अजूनही अनेकांना कोटा संपल्यानंतर थाळी मिळत नाही. त्यामुळे ...
सातारा : राज्य शासनाने गरीब, गरजूंसाठी शिवभोजन थाळी आणली असली तरी अजूनही अनेकांना कोटा संपल्यानंतर थाळी मिळत नाही. त्यामुळे त्यांना माघारी जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात दीड वर्षापूर्वी महाआघाडीचे शासन सत्तेवर आले. त्यानंतर शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. गरीब, गरजू लोकांसाठी ही थाळी आहे. सध्या शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात निर्बंध लागू आहेत. यासाठी शिवभोजन थाळीच्या प्रतिदिन संख्येत दीडपट वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळालाय. असे असले तरी अजूनही अनेकांना शिवभोजन केंद्रांचा कोटा संपल्यानंतर लाभ मिळत नाही. सातारा शहरातही अशी स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे - ३०
रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या - ३,७५०
सातारा शहरातील शिवभोजन केंद्रे - ४
शहरातील रोजची लाभार्थी संख्या - ६७५
..............
चौकट :
वाट पाहूनही लाभ नाही...
शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक सकाळपासूनच वाट पाहत थांबतात. केंद्र सुरू झाल्यानंतर ओळीने प्रत्येकाला थाळी पार्सल देण्यात येते. पण, काही वेळा थांबूनही लाभ मिळत नाही. त्यामुळे हेलपाटा बसतो. त्यामुळे लाभार्थी संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
......
सातारा शहरात शिवभोजनची चार केंद्रे आहेत. या चारही ठिकाणी थाळीचा लाभ घेण्यासाठी गरीब, गरजू वाट पाहत असतात. कोटा संपून गेला तरी लाभार्थी येतच असतात. त्यामुळे गरज असूनही शिवभोजन थाळीचा लाभ मिळत नाही.
.......................
रोज पावणेचार हजार जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?
- जिल्ह्यात शिवभोजन थाळीची एकूण ३० केंद्रे आहेत. त्यामधून ३,७५० जणांना थाळीचा लाभ मिळतो.
- अनेक गरजू सकाळपासून थांबतात. अनेकांना लाभ मिळत नाही. यासाठी कोटा वाढविण्याची गरज आहे.
.............................................
फोटो दि.२७सातारा शिवभोजन केंद्र फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे शिवभोजन केंद्रासमोर वेळेच्या पूर्वी नागरिक येऊन थांबत आहेत.
.............................................................