सर्वांनी कोरोनाला रोखण्याचे काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:45+5:302021-05-09T04:40:45+5:30
आदर्की : ‘कोराना महामारीचे संकट ग्रामीण भागात संसर्गामुळे वाढत आहे. या महामारीला सामोरे जाण्यासाठी गावोगावी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू ...
आदर्की : ‘कोराना महामारीचे संकट ग्रामीण भागात संसर्गामुळे वाढत आहे. या महामारीला सामोरे जाण्यासाठी गावोगावी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करून कोरोनाला रोखण्याचे काम करावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट यांनी केले. टाकोबाईचीवाडी (ता. फलटण) येथे लोकसहभाग, ग्रामपंचायत यांनी पंधरा बेडचा विलगीकरण कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बिबी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. संदीप खताळ, विक्रांत झणझणे, सरपंच कुनाल झणझणे, उपसरपंच नीलेश झणझणे, अनिकेत झणझणे, डॉ. तेजस्विनी पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या विलगीकरण कक्षामध्ये सॅनिटायझर, रुग्णांना नाष्टा, औषधे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
०८आदर्की
फोटो - टाकोबाईवाडी (ता. फलटण) येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन डॉ. संदीप खताळ यांनी केले. यावेळी धैर्यशील अनपट, कुनाल झणझणे, विक्रांत झणझणे, आदी उपस्थित होते.