कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा : डुबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:04 AM2021-06-12T04:04:27+5:302021-06-12T04:04:27+5:30
वाई : वाई तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांनी ५२ हजार रुपये मदत देऊन सामाजिक ...
वाई : वाई तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांनी ५२ हजार रुपये मदत देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा आहे, असे उद्गार किसन वीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. रमेश डुबल यांनी काढले.
जनता शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मदतीची रक्कम गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या निधीचा गोरगरिबांना औषध उपचारासाठी उपयोग केला जाईल, अशी ग्वाही गटशिक्षण अधिकारी यांनी दिली
यावेळी सातारा मुख्याध्यापक संघाचे सचिव विजय येवल, प्राचार्य एकनाथ भालेराव यांनी माध्यमिक शिक्षकांच्या योगदानाबद्दल सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत जमदाडे, नंदकुमार भोसले यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक संजय कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र भोसले यांनी आभार मानले. यावेळी जनता शिक्षण संस्था सचिव जयंतराव चौधरी, शालन जाधव, संजीवन शिंदे, महेंद्र भोसले, विजय आगम आदी उपस्थित होते.