Crime News Satara: माजी सैनिकाची रायफल केली लंपास, बहीण भावाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:26 PM2022-05-25T18:26:32+5:302022-05-25T18:26:40+5:30

बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने डबल बोअरची रायफल आणि १४ जिवंत काडतुसे चोरून नेली होती.

Ex soldier rifle stolen, sister and brother arrested in satara | Crime News Satara: माजी सैनिकाची रायफल केली लंपास, बहीण भावाला अटक

Crime News Satara: माजी सैनिकाची रायफल केली लंपास, बहीण भावाला अटक

googlenewsNext

सातारा : वर्णे, ता. सातारा येथील माजी सैनिक संजय मुरलीधर जातक (वय ५७) यांची डबल बोअर रायफलची चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आज, बुधवारी बहीण-भावाला अटक केली. त्यांच्याकडून चोरीची रायफल तसेच १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

प्रवीण रामू पवार (वय १९), संगीता विजय राठोड (३०, सध्या रा. जनाई मळाई मंदिराच्या पायथ्याला चंदननगर, कोडोली सातारा, मूळ रा. उडगी, ता. बागेवाडी, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या बहीण-भावाची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जातक हे सैन्य दलातून निवृत्त झाले असून, ते साताऱ्यातील देगाव फाट्याजवळील संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. १२ एप्रिल २०२२ रोजी त्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने डबल बोअरची रायफल आणि १४ जिवंत काडतुसे चोरून नेली होती. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.

शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी आणि कर्मचारी याचा तपास करत असतानाच त्यांना या बहीण-भावाकडे एक रायफल असून, ती त्यांनी त्यांच्या झोपडीवजा घरात लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कोडोली येथे जाऊन प्रवीण आणि संगीताला अटक करुन त्यांच्याकडून चोरीची रायफल जप्त आणि काडतुसे जप्त केली.

हे दोघे कर्नाटकातून ऊसतोडीच्या कामासाठी आले होते. या दोघांनी आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम निकम, संतोष कचरे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Ex soldier rifle stolen, sister and brother arrested in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.