शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालयांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:28+5:302021-08-20T04:45:28+5:30
गट पुरवठादारांना आवाहन सातारा : महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाकडून २०२१-२०२२ जिल्हा परिषद सेस योजनेतून ...
गट पुरवठादारांना आवाहन
सातारा : महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाकडून २०२१-२०२२ जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला लाभार्थींना तलंगा गट वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक पुरवठादारांनी आली दरपत्रके १५ सप्टेंबर २०२१पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
आयआयएचटीमध्ये प्रवेशाचे आवाहन
सातारा : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगढ, ओडिसा येथे प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा अभ्यासक्रम तीन वर्षीय म्हणजेच सहा सत्रामध्ये असून, प्रवेशाबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालवडेत कोविड लसीकरण
सातारा : येथील राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने कऱ्हाड तालुक्यातील कालवडे, बेलवडे बुद्रूक, वाठार व रेठरे खुर्द या गावांतील दिव्यांगांसाठी कालवडे येथे कोविड लसीकरणाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास कालवडेचे उपसरपंच साहेबराव करांडे, कालवडेच्या पोलीस पाटील शुभांगी गाडे, कार्यकर्ते विकास शिंदे, सुरज काकडे, सोमनाथ थोरात, विकास जाधव, जगूताई जगताप, सुनील पवार, विजू कारंडे उपस्थित होते.
कृषिकन्येचे जिवामृतबाबत मार्गदर्शन
सातारा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजमाची येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयांमधील विविध कृषी कार्यानुभव कार्यक्रमातून महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृषिकन्या पद्मनयना सुतार हिने बदेवाडीतील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती अंतर्गत जिवामृत तयार करून वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तिला मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
....................