तांबवेत विलगीकरण कक्षातील रुग्णांची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:30+5:302021-04-29T04:31:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणंद : मौजे तांबवे (ता. फलटण) येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे जबाबदार ग्रामस्थांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद : मौजे तांबवे (ता. फलटण) येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे जबाबदार ग्रामस्थांनी तांबवे गावातील विविध शाळांमध्ये कोविडने बाधित रुग्णांसाठी उपचारासाठी व समुपदेशनासाठी विविध शाळा उपलब्ध करून त्यामध्ये एका शाळेत महिला रुग्ण व दुसऱ्या शाळेत पुरुष रुग्ण दाखल आहेत.
लोणंद येथील हिमालय फाउंडेशन यांनी भेट देऊन डॉ. प्रज्ञेश गोरड व डाॅ. दीपेंद्र कोकरे यांच्यामार्फत विविध तपासण्या करण्यात आल्या व लवकरच बरे व्हाल, असा दिलासा दिला. यावेळी या केंद्रास ब्लड तपासणी यंत्र व ब्लड, शुगर तपासणीचे अत्याधुनिक यंत्र देण्याची जबाबदारीही फाउंडेशनने घेतली.
यावेळी हिमालय फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. माधुरी जाधव, उपाध्यक्ष सत्यजित शानबाग, सचिव जावेद पटेल, जयंत कुलकर्णी, महंमदभाई मुल्ला, ॲड. सुरेश शेट्टी, आयुब सय्यद, सुजित बर्गे, मच्छिंद्र शिंदे, विशाल शिंदे आदी ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.
हिमालय फाऊंडेशनने घेतलेली जबाबदारी दुसऱ्याच दिवशी पार पाडण्यात आली. रुग्णाची आवश्यकता पाहता ही उपकरणे हिमालय फाऊंडेशनद्वारे देण्यात आली.
यावेळी सत्यजित शानबाग, जावेद पटेल, डॉ. प्रज्ञेश गोरड, जयंत कुलकर्णी उपस्थित होते.