लक्षणे दिसताच कोरोना तपासणी करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:55+5:302021-05-30T04:29:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव : ‘आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचे योग्य सर्वेक्षण करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तरडगाव : ‘आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींचे योग्य सर्वेक्षण करून कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लक्षणे दिसताच संबंधितांच्या कोरोना तपासण्या करून घ्याव्यात,’ अशा सूचना आरोग्य विभागासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
फलटण तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चांदोबाचा लिंब, तरडगाव येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कक्षात दाखल असलेल्या रुग्णांची व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांची होणारी दैनंदिन तपासणी याबाबत माहिती घेतली. तसेच कोरोनाबाधित व्यक्तीला गृह अलगीकरणात ठेवण्याचा धोका न घेता, थेट त्याला विलगीकरण कक्षात दाखल करा, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी तपासणीसाठी येणाऱ्या सर्व डॉक्टरांना योग्य तपासणीसंदर्भात सूचना केल्या. दरम्यान, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या कामकाजाची माहिती घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे, पोलीसपाटील भरत अडसूळ, उपसरपंच प्रदीप गायकवाड, प्रशांत गायकवाड, बाळासाहेब मोहिते, दीपक गायकवाड, संतोष कुंभार, विजयकुमार शहा, ऋषिकेश चव्हाण, प्रवीण खताळ, राजेंद्र गायकवाड, अजित भोईटे, आदी उपस्थित होते.
(चौकट)
कक्षात ३० रुग्ण दाखल
१०१ बेडच्या येथील विलगीकरण कक्षात सध्या परिसरातील एकूण ३० बाधित रुग्ण दाखल आहेत. लोकसहभागातून त्यांना लागणाऱ्या आवश्यक मूलभूत गरजांची पूर्तता केली जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
२९ तरडगाव
फोटो : तरडगाव (ता. फलटण) येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करतानाच कोरोना कामकाजाचा आढावा घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार दीपक चव्हाण, पदाधिकारी उपस्थित होते. (छाया: सचिन गायकवाड)