मलकापुरात केबलच्या खुदाईने उपमार्गाची चाळण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:00+5:302021-05-31T04:28:00+5:30

मलकापूर : केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे महामार्गाच्या पूर्वेकडील उपमार्गाची चाळण झाली आहे. खोदकामात काढलेली चर व्यवस्थित न बुजविल्याने चरीत ...

Excavation of cableway in Malkapur! | मलकापुरात केबलच्या खुदाईने उपमार्गाची चाळण!

मलकापुरात केबलच्या खुदाईने उपमार्गाची चाळण!

Next

मलकापूर : केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे महामार्गाच्या पूर्वेकडील उपमार्गाची चाळण झाली आहे. खोदकामात काढलेली चर व्यवस्थित न बुजविल्याने चरीत घातलेली भर एकाच पावसात धुऊन गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. केबलच्या कामासाठी उपमार्गावरील खोदकामाबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपासून विविध कंपनींसह मिल्ट्रीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. पूर्वेकडील उपमार्गालगत चर काढून केबल टाकण्याचे काम केले आहे. मात्र, संबंधित कंत्राटदारांनी हे काम करत असताना काही ठिकाणी रस्त्याकडेला साधारण शंभर शंभर मीटर अंतरात खड्डे खणले आहेत. काम झाल्यानंतर हे खड्डे व चर केवळ माती व दगडाच्या साह्याने बुजवले, तर काही ठिकाणी उकरलेली माती आहे तशीच आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने चर काढतात. केबल टाकून झाल्यानंतर जेसीबीनेच ती कशीतरी बुजवली. ती चरीतील भर शनिवारी झालेल्या एकाच पावसाने धुऊन गेली आहे. त्यामुळे उपमार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर केबलचा जोड असतो त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार केला आहे, त्याला सुरक्षिततेसाठी केवळ पट्ट्या बांधल्या आहेत. ते सुरक्षा कवचही वाऱ्याने पडले आहे. असे खड्डे व चर रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी हे खोदकाम केलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. या धोकादायक परिस्थितीकडे महामार्ग देखभाल विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.

चौकट

नेमकी नुकसानभरपाई कुणाकडे...

मलकापूर शहरातील महामार्गासह दोन्हीही उपमार्ग रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आहेत. विविध कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या कामाला संबंधित शासकीय विभाग की पालिका यापैकी नेमके कोण परवानगी देते, या कामात झालेल्या रस्त्याच्या नुकसानभरपाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.

(चौकट)

जोडणीसाठी जागोजागी खड्डे

चर काढत केबल टाकली आहे. मात्र, साधारणपणे प्रत्येक शंभर मीटर अंतरात केबल जोडणीसाठी खोल खड्डे खोदण्यात आले आहे. हेच खड्डे धोकादायक बनले आहेत. अशा रस्त्यातच खड्ड्यात वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहे. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे ते खड्डे जास्तच धोकादायक बनले आहेत.

३०मलकापूर

मलकापूर येथे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी उपमार्गावर चर खोदली आहे. त्या चरीत घातलेली भर एका पावसातच धुऊन गेली. (छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

300521\img_20210529_183655.jpg~300521\img_20210529_191953.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

आफ्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी उपमार्गावर चर खोदली. त्या चरीत घातलेली भर एका पावसातच धुऊन गेली. (छाया- माणिक डोंगरे)~मलकापूरात उपमार्गावर खड्डे धोकादायक झाले आहेत

Web Title: Excavation of cableway in Malkapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.