अरेच्चा.. पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत पुन्हा रस्ता खुदाई, वाहनधारकांची मोठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:51 PM2018-02-07T14:51:33+5:302018-02-07T14:55:41+5:30
पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते.
सातारा : पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच सातारा शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. आता कुठे खड्ड्यांचे शुल्ककाष्ट संपले असतानाच पुन्हा शहरातील रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खोदले जात आहेत. बुधवारी सकाळपासून कमानी हौदाजवळील रस्ता खोदण्यात येत आहे.
जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदल्यामुळे निम्म्या रस्त्यावर मातीचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साताऱ्यांतील राजपथ हा मुख्य रस्ता आहे. नेमक्या याच रस्त्यावर मोठा खड्डा खणण्यात आला आहे.
एसटी आणि स्कूलबसला या रस्त्यावरून जाता येईना. सध्या तरी या रस्त्यावरील वाहतूक राजपथावरूनच सुरू आहे. जेसीबीने खोदलेला खड्डा तातडीने मुजविण्यात यावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे.