गांजा विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:39 AM2021-03-20T04:39:38+5:302021-03-20T04:39:38+5:30
महाबळेश्वर : केळघर (ता. जावळी) येथील एका फार्महाऊसवर गांज्याची विक्री होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर ...
महाबळेश्वर : केळघर (ता. जावळी) येथील एका फार्महाऊसवर गांज्याची विक्री होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत २३.६३१ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
संतोष पांडुरंग पार्टे (रा. केळघर, ता. जावळी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केळघर येथील संतोष पार्टे याच्या फार्महाऊसवर गांजा विक्रीबाबत गोपनीय माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पार्टे यांच्या फार्महाऊसवर बुधवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये एकूण २३.६३१ किलोग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची सध्याची किंमत तीन लाख रुपये आहे. याप्रकरणी संतोष पार्टे याला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जावळी (मेढा) न्यायालयात हजर केले. न्यायमूर्ती एन. एस. काळे यांनी ३१ मार्चपर्यंत सातारा येथे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. जे. आर. इंगळे यांनी काम पाहिले. ही कारवाई पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या अखत्यारित दापोली उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त अमित नायक एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व जवान मधुकर भोईटे यांच्या देखरेखीखाली तसेच अधीक्षक महेश कुमार यादव यांच्यासह पथकातील निरीक्षक अमर बहादूर मौर्य, मनाली शिवप्रकाश कथले, मुकेश कुमार, हवालदार एस. एम. आंबेकर, एस. एस. विलंकर, के. एल. ढेबे व वी. के. कात्रट यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.