उंडाळे येथे कृषी चर्चासत्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:42+5:302021-02-23T04:57:42+5:30
सातारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने उंडाळे (ता. कऱ्हाड ) येथे एकदिवसीय मासिक चर्चासत्र घेण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी ...
सातारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने उंडाळे (ता. कऱ्हाड ) येथे एकदिवसीय मासिक चर्चासत्र घेण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत काळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
उंडाळे (ता. कऱ्हाड) येथील व्ही. एल. अँड सन्स ॲग्रो प्रोडूसर कंपनी यांच्या सभागृहात हे चर्चासत्र संपन्न झाले.
गुरुदत्त काळे म्हणाले, व्ही. एल. अँड सन्स ॲग्रो प्रोडूसर कंपनी ही डोंगरी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. या कंपनीमुळे शेतकऱ्यांचा शेतीविषयक गरजा पूर्ण होऊन विभागातील शेती विकासाला मोठी मदत होईल.
कार्यक्रमाला ‘आत्मा’चे संचालक उत्तमराव देसाई, अशोकराव देसाई, आदी कृषी अधिकारी, तसेच कंपनीचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक उदय पाटील, धनंजय पाटील, विमल पाटील, पुष्पदेवी पाटील, विद्या पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. विलासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. उदय पाटील यांनी स्वागत केले. धनंजय पाटील यांनी आभार मानले.
फोटो ओळ : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे कृषी चर्चासत्रादरम्यान ॲग्रो प्रोडूसर कंपनीची पाहणी करताना जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे व इतर उपस्थित होते.
फोटो 22pramod 3