पार्ले रेल्वेच्या प्रस्तावात वगळलेल्या जमिनीचा समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:37+5:302021-03-04T05:13:37+5:30

रेल्वेच्या भूसंपादन प्रस्तावामध्ये पार्ले येथील शेतकऱ्यांचे अडतीस गट नंबर संपादित करण्याचा प्रस्ताव आला आहे. सदर प्रस्तावामधून रेल्वेच्या जवळील काही ...

Excluded land should be included in the proposal of Parle Railway | पार्ले रेल्वेच्या प्रस्तावात वगळलेल्या जमिनीचा समावेश करावा

पार्ले रेल्वेच्या प्रस्तावात वगळलेल्या जमिनीचा समावेश करावा

Next

रेल्वेच्या भूसंपादन प्रस्तावामध्ये पार्ले येथील शेतकऱ्यांचे अडतीस गट नंबर संपादित करण्याचा प्रस्ताव आला आहे. सदर प्रस्तावामधून रेल्वेच्या जवळील काही गट वगळण्यात आले आहेत. सदर गट हे रेल्वे रुळाच्या जवळ आहेत, तर काही गट नंबरचे क्षेत्र हे रेल्वेच्या दोन्ही बाजूस असून, सदर क्षेत्राच्या मधूनच रेल्वे ट्रॅक गेला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दुहेरीकरणामध्ये सदर शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे; परंतु रेल्वे विभागामार्फत प्रस्ताव आल्याशिवाय सदर क्षेत्राचे भूसंपादन होणार नसल्याने आज पार्ले गावातील रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे, बनवडीचे माजी सरपंच शंकर खापे, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब नलवडे, रघुनाथ नलवडे, रणधीर पाटील, अनिल नलवडे, ज्ञानदेव खापे, ज्ञानदेव नलवडे यांनी प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन रेल्वेच्या भूसंपादनातून वगळण्यात आलेल्या गटांचे नवीन प्रस्ताव तयार करून सदर गटाची सरकारी मोजणी करण्यात यावी. बाधित क्षेत्राला बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Excluded land should be included in the proposal of Parle Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.