ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:42 PM2017-08-01T17:42:13+5:302017-08-01T17:42:13+5:30

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

Expenditure incurred for empty bottles of liquor in the Ogllewadi area | ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

ओगलेवाडी परिसरात रस्त्याकडेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

Next
ठळक मुद्दे शेतशिवारासह कचºयाच्या ढिगाºयात फुटलेल्या बाटल्या, ग्रामस्थांना इजा होण्याची शक्यता

ओगलेवाडी (जि. सातारा) : हायवेनजीकचे बार बंद झाले असले तरी मद्यपींच्या पिण्यात काही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. त्यांचा पिण्याचा कार्यक्रम नेहमीसारखाच सुरू आहे. महामार्गानजीकचे बार बंद झाल्यामुळे त्यांचे ठिकाण मात्र बदलेले आहे. शेतशिवार आणि रात्रीच्यावेळी चक्क रस्त्याकडेलाही मद्यपींचा अड्डा रंगत आहे. ओगलेवाडी, ता. कºहाड परिसरात ही स्थिती असून मद्यपी दारूच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यानजीकच टाकून देत असल्याने ग्रामस्थांना इजा होण्याच्या घटना घडत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्ग आणि राज्यमार्ग यापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत दारूविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रस्त्याकडेची सर्व दुकाने बंद झाली आहेत. पण मद्यपिणाºयांना ती कोठून आणि कशी उपलब्ध करायची याचा ‘मार्ग’ चांगलाच माहित आहे. त्यामुळे दारूविक्री तसेच पिण्यास बंदी असून देखील ती त्यांच्याकडून पिली जात आहेत. मात्र, दारू मिळूनही ती पिण्यास जागाच उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडून रात्रीच्यावेळी अंधारात गाडी रस्त्याकडेला लावून शेतशिवारात जाऊन त्या ठिकाणी पिण्याचे कार्यक्रम करीत आहेत.

ही परिस्थिती सध्या ओगलेवाडी मार्गावर पहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला मद्यपानाचा कार्यक्रम संपल्यानंतर मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या  शेतशिवारात तसेच रस्त्याकडेला टाकून देत आहेत.

रात्रीच्यावेळी मद्यपींनी केलेल्या कार्यक्रमाचे परिणामी दिवसा शेतशिवारातील शेतकºयांना भोगावे लागत आहेत. शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या पायांना बाटल्यांच्या फुटलेल्या काचा लागून त्यांना गंभीर दुखापत होत आहेत. त्यापासून सुटका मिळवित शेतकरी त्या रिकाम्या बाटल्या रस्त्याकडेला टाकत आहेत. 

मोकळ्या फुटलेल्या बाटल्या या रस्त्यावर तसेच रस्त्याकडेला असलेल्या साईड पट्यांवर पडत असल्याने त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने जाऊन वाहने पंक्चर होत आहेत.

Web Title: Expenditure incurred for empty bottles of liquor in the Ogllewadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.