उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढली

By Admin | Published: March 25, 2015 10:34 PM2015-03-25T22:34:57+5:302015-03-26T00:09:20+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; पूर्वीच्या पाच हजारांवरून आता २५ हजारांपर्यंत खर्च करता येणार

Expenditure limit for candidates increased | उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढली

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढली

googlenewsNext

सातारा : ‘ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांसाठीच खर्च मर्यादा वाढविण्यात आली असून, पूर्वीच्या पाच हजार रुपये खर्च मर्यादेवरून वाढवून ती आता २५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरलक्ष ठेवण्यात येणार आहे,’अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील मे ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण ७१४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १६९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये इतकी खर्च मर्यादा देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ५०० रुपये तर राखीव जागेवरील उमेदवाराला १०० रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी १६ हजार ५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.निवडणूक जाहीर झालेल्या गावांची आकडेवारी तालुकानिहाय अशी : सातारा : ४१, कोरेगाव : ५१, जावळी : ५६, कऱ्हाड : ९८, पाटण : ९५, वाई : ७१, महाबळेश्वर : २४, खंडाळा : ५५, फलटण : ७८, खटाव : ८८, माण : ५७ पोटनिवडणूक लागलेल्या गावांची आकडेवारी तालुकानिहाय अशी : सातारा : ३०, कोरेगाव : २८, जावळी : २८, पाटण : ४६, वाई : १०, महाबळेश्वर : २६, माण : १ या निवडणुकीसाठी ३ हजार ११४ मतदान यंत्रांची आवश्यकता असून, जिल्हा प्रशासनाकडे १ हजार १८८ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. १ हजार ९२६ मतदान यंत्रांची निवडणूक आयोगाकडे मागणी केली जाणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. २२ एप्रिल रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होईल. २३ एप्रिल रोजी मतमोजणी होईल.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

कोरेगावचीही निवडणूक
तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया नगरविकास विभागाने सुरु केली आहे. त्यावरील हरकती मागविल्या आहेत. तरीही कोरेगावची निवडणूक लागली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ‘मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. भविष्यात कोरेगावात नगरपंचायत झाल्यास पुन्हा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रक्रिया केली जाईल,’ असे त्यांनी सांगितले.

सरपंच आरक्षण सोडत १ एप्रिल रोजी
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडती बुधवार, दि. १ एप्रिल रोजी होणार आहेत. या सोडती तालुकावार घेतल्या जातील. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत लागू राहणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
ग्रामपंचायतीसाठी राखीव जागेवर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने जात वैधता प्रमाणपत्र जोडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. सहा महिने मुदत न मिळाल्यास राखीव जागांसाठी उमेदवारांची ओढाओढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Expenditure limit for candidates increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.