रस्त्यावर वाढदिवस करणे पडणार महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:25+5:302021-09-18T04:42:25+5:30
जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये रस्त्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार घडतात. महाविद्यालयीन युवकांमध्ये ही ‘क्रेझ’ सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. सार्वजनिक ठिकाणी ...
जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये रस्त्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार घडतात. महाविद्यालयीन युवकांमध्ये ही ‘क्रेझ’ सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात किंवा चौकात मित्रांचा घोळका करायचा. केक कापायचा. आणि हे करताना गोंधळ घालायचा. असा प्रकार युवकांकडून केला जातो. मात्र, त्यांच्या या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग पावते. आजुबाजुच्या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. मात्र, याचा कसलाही विचार न करता केवळ ‘एन्जॉय’ करण्याच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करुन सामाजिक शांतता भंग करण्याचे काम युवकांकडून केले जाते. सध्या अशा प्रकारे साजºया होणाºया वाढदिवसांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
- चौकट
... तर होणार कारवाई
१) रस्त्यात वाहनावर केक कापणे
२) तलवारीने केक कापणे
३) आरडाओरडा करून गोंधळ घालणे
४) गाणी लावून धिंगाणा करणे
५) मध्यरात्री फटाके फोडणे
- चौकट
रस्त्यावर वाढदिवस
करणाºयांवर कारवाई
वर्ष : कारवाई
२०१९ : १६३
२०२० : ९३
२०२१ : ४२
(आॅगस्टअखेर)
- कोट
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी असभ्य आणि त्रासदायक वर्तन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होऊ शकते. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. रस्त्यावर वाढदिवस करुन कोणी गोंधळ घातल्यास संबंधितांना कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- अजयकुमार बन्सल
पोलीस अधिक्षक, सातारा