घरात स्फोट; कऱ्हाडात कुटुंबातील पाचजण गंभीर, भीषण स्फोटाने मुजावर कॉलनी हादरली

By संजय पाटील | Published: October 25, 2023 10:26 AM2023-10-25T10:26:03+5:302023-10-25T10:26:23+5:30

घराची पडझड

explosion in the house; Five members of the family were seriously injured in the attack. | घरात स्फोट; कऱ्हाडात कुटुंबातील पाचजण गंभीर, भीषण स्फोटाने मुजावर कॉलनी हादरली

घरात स्फोट; कऱ्हाडात कुटुंबातील पाचजण गंभीर, भीषण स्फोटाने मुजावर कॉलनी हादरली

कऱ्हाड : येथील मुजावर कॉलनीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनी हादरली असून स्फोटात शकिल मुल्ला यांच्या कुटूंबातील पाचजण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जबरदस्त होता की घराच्या भिंतींचीही पडझड झाली आहे. या घटनेमुळे मुजावर कॉलनी परिसरात प्रचंड धावपळ उडाली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शकील मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी धावण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटात मुल्ला कुटूंबातील पाचजण जखमी झाले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपुर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला. या स्फोटाने मुल्ला कुटूंबाच्या घराच्या भिंतींची पडझड झाली. या स्फोटाने घराला आग लागली.

घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. जखमींना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून नेमका स्फोट कशाचा झाला, याची माहिती घेतली जात आहे.

घरातील सिलेंडर सुरक्षित सुरक्षित

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आलेले आहेत. मात्र तिन्ही सिलेंडर सुरक्षित आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा झाला नसावा अशी दाट शक्यता आहे. स्फोटाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.

Web Title: explosion in the house; Five members of the family were seriously injured in the attack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.